spot_img
spot_img

शेवगाव बाजार समितीमध्ये 18 जागेवर राष्ट्रवादी विजय

शेवगांव( प्रतिनिधी) :- शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी आज मतदान प्रक्रिया संपली आणि लगेच मतमोजणी सुरू झाली, १८ पैकी १८ जागा मिळवून राष्ट्रवादी प्रणित ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाने सत्ता कायम राखली आहे. 

 ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाने या वेळी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण होते, याचा परिणाम म्हणून सर्वानीच पोटतिडकीने प्रचार मोहीम राबवली.आणि प्रंचड बहुमत मिळवत सत्ता कायम राखली. 

ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे श्री राजेंद्र दौंड यांनी ६७९ मतदान घेत तालुक्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेला उमेदवार म्हणून बाजी मारली. 
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती साठी ९७.७१ टक्के मतदान झाले. सेवा सोसायटी मतदार संघात ९११ मतदाना पैकी ८८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदार संघात  
८६९ मतदार पैकी ८४४ तर व्यापारी मतदारसंघात १८६ पैकी १८३ मतदारांनी आपला हक्क बजावला. हमाल मापाडी मतदारसंघात २२१ पैकी २२१ मतदान झाले,  एकूण २१८७ मतदारां पैकी २१३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!