राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- मा. नामदार. डॉ. राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील मंत्री, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य. यांच्या संकल्पनेतून महसूल पंधरवडा २०२४ “एक हात मदतीचा – दिव्यांगांच्या कल्याणाचा”या पंधरवडाचे औचित्य साधून दिनांक १२ रोजी तहसील कार्यालय राहाता येथे समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहमदनगर आणि स्पेशल ऑलम्पिकस भारत – महाराष्ट्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सहाय्यक साधनाचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग पुनर्वसन केंद्रांमार्फत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या शासकीय योजनाची माहिती देण्यात आली. तसेच दिव्यांग खेळाडूंची नोंदणी व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहमदनगर दिव्यांगांना एडीप, सिपडा व महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत सहाय्यक साधनांचे वाटप करत असते. तसेच दिव्यांग खेळाडूंना स्पेशल ऑलम्पिकस भारत – महाराष्ट्र अहमदनगर अंतर्गत खेळाचे प्रशिक्षण विखे पाटील फौंडेशन,अहमदनगर येथे देण्यात येते.
या कार्यक्रमासाठी तहसीलदार श्री. अमोल मोरे, नायब तहसीलदार श्री. बाबासाहेब मुळे, गट विकास अधिकारी श्री. जालिंदर पठारे आणि गट शिक्षणाधिकारी श्री. राजेश पावसे उपस्थित होते.तहसीलदार श्री. अमोल मोरे यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र करत असलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच या पुढे ही राहाता तालुक्यातील दिव्यांगांना अशा प्रकारची मदत तहसील कार्यालयामार्फत मिळत राहील हे या भाषणांमध्ये सांगितले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नामदार. डॉ. राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील मंत्री, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य व मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात विविध योजना दिव्यांग व वयोवृद्धापर्यंत पोहचवत आहे.