पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघ हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून आताच काही महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली पारनेर-नगर मतदारसंघात शिवसेनेने आपली ताकद खासदार निलेश लंके यांच्या पाठीशी उभी केली व त्यांना मताधिक्क्य मिळवून दिले आहे, तसेच आताही डॉ.श्रीकांत पठारे हे शिवसेना पक्षाचे विचार उध्दव ठाकरे यांचा नवमहाराष्ट्राचा संकल्प गावागावात-वाड्यावस्त्यांवर आणि घराघरात पोहचवत असून भगवा सप्ताहनिमित्त काढलेल्या भव्य मशाल यात्रेच्या माध्यमातुन डॉ.श्रीकांत पठारे यांनी पक्षासाठी अतिशय चांगल काम केले असून त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतलेली आहे.
त्यांनी केलेले शक्तीप्रदर्शनही हे पारनेर तालुक्यात शिवसेनेची ताकद दाखवून देणारे आहे आणि यामुळेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पारनेर-नगर मतदारसंघाची जागा शिवसेनेलाच घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारनेर तालुका संपर्कप्रमुख दादाभाऊ येणारे यांनी केले. ते मशाल यात्रेदरम्यान झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताहनिमित्त मशाल यात्रा येवढ्या भव्यदिव्य प्रकारे काढणारे डॉ.श्रीकांत पठारे हे महाराष्ट्रातील पहिलेच तालुकाप्रमुख असल्याचे गौरवोद्गारही
संपर्कप्रमुख दादाभाऊ येणारे यांनी काढले. तसेच डॉ.पठारे यांनी गेले तीन महिने तालुक्यात केलेली आरोग्यसेवाही तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय गरजेची ठरली आहे आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली असल्याचे भाष्यही येणारे यांनी केले व विधानसभा निवडणुकीसाठी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून डॉ.श्रीकांत पठारे हे प्रबळ दावेदार असल्याचे संकेतही दिले आहेत.