संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-–लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगली यश मिळाले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा निहाय आढावा बैठका घेतला असून राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा असल्याचे प्रतिपादन आमदार थोरात यांनी केले असून या सर्व आढावा बैठकांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी ,जालना, बुलढाणा, वाशिम, भोकरदन, अमरावती येथे काँग्रेसच्या जिल्हा निहाय बैठका झाल्या यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बंटी पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार यशोमती ठाकूर, यांच्यासह राज्यभरातील प्रमुख नेते उपस्थित आहेत.
महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा महत्त्वाचा वाटा राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षांबरोबरच पुरोगामी विचाराच्या सर्व पक्षांची आमदार बाळासाहेब थोरात यांचे चांगले संबंध आहे मितभाषी संयमी अभ्यासू व संस्कृत नेतृत्व असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांचा विरोधी पक्षातही आदर केला जातो
1985 पासून संगमनेर मधून विक्रमी मताधिक्याने सलग आठ वेळा विजय होताना ते विधानमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य राहिले आहेत याचबरोबर राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, रोहयो, जलसंधारण अशा विविध आठ विभागांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी या सर्व खात्यांना लोकाभिमुख बनवले. कोरोना संकट काळातही महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळताना शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा उचलला. याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी जनतेला पाणी दिले.
काँग्रेस पक्ष हा सर्वधर्मसमभाव व सर्वांना सोबत घेऊन जाणार असून या पक्षाला मोठा जनाधार आहे. आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत सैनिक असून अत्यंत अडचणीच्या काळामध्ये त्यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळली आहे.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, राज्यामध्ये सध्या वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या तीन पक्षांचे सरकार आहे. प्रशासनात गोंधळ आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी होणार की नाही याची शाश्वती नाही. निवडणुकीसाठी केलेल्या घोषणांना महाराष्ट्र फसणार नाही.
महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेचा मोठा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. मराठवाड्यातील मोठे नेते सोडून गेले असे अनेक जण सांगत असताना नांदेड सह मराठवाड्यातून काँग्रेसला मोठा पाठिंबा मिळत आहे. लोकांना लोकांचे सरकार हवे आहे. आणि येणाऱ्या दोन महिन्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री राहणार असा विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी नाना पटोले ,रमेश चेन्नीथला, विजय वडेट्टीवार, बंटी पाटील, यशोमती ठाकूर, अमित देशमुख यांच्यासह विविध नेत्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
आमदार थोरात यांचे प्रत्येक ठिकाणी जोरदार स्वागत
काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत, सर्वात ज्येष्ठ ,संयमी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांची ओळख असून मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यामधून जात असताना आमदार थोरात यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी गौरव करताना अभूतपूर्व स्वागत केले..