महेश रकताटे (कार्यकारी संपादक )
जेवढे शिकले तेव्हढे हुकले अशी म्हण प्रत्येकजण म्हणत असतो. या म्हणीचा प्रत्यय मात्र सदैव येत आहे. जिल्हा परिषदेतील काही कर्मचार्यांच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडत आहे. येथील काही कर्मचारी जितके शिकलेेले आहेत. तितकेच त्यांच्या वर्तनुकीतून हुकलेले असल्याचे स्पष्ट होतआहे.
जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी मावा गायछाप सारखे पदार्थ खाऊन इमारतीत वाटेल तेथे थुंकत आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीची विद्रुपीकरण होत आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी टेबल जवळ असलेल्या डसबीनमध्ये तंबाखू सारखे पदार्थ थुंकत असल्याच्या घटनाही घडत आहेत. हा किळसवाना प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेत सुरू आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी झालेल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या पाठी मागील बाजूस असलेल्या खिडक्यांमधून मावा गुटख्याच्या पिचकार्यां मारल्या जात आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार जिल्हा परिषदेत सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पिचकारीने जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी रंगलेले आहेत. तरीही कर्मचाऱ्यांच्या मारण्याच्या सवयी अद्याप गेलेल्या नाहीत.
जिल्हा परिषदेत गुटखा व मावा खाऊन थुकण्यावर शासकीय इमारतीचे विद्रोपीकरण करणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणे आदींनुसार आधार घेऊन दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. प्रशासन फक्त बघ्यायची भूमिका घेत आहे.
काहीजणांनी दुपारच्या सुटीत जेवनाच्या वेळेस खिडकीतून हात धुन्यास सुरवात केलेली आहे. या त्यांच्या सवयीने अनेकांच्या अंगावर पाणी पडूनही या कर्मचाऱ्यांच्या सवयी बंद झालेल्या नाहीत.
प्रशासनच ढिम्म
कर्मचाऱ्यांच्या या गैरवर्तणुकीकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.प्रशासनाने कडक भूमिका घेतली तर आगामी काळात जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे विद्रूपिकीकरण थांबेल. अन्यथा आहे ती परिस्थिती कायम राहिल.
बेसीन लालेलाल
जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी बेसिनमध्येच गुटखा व तंबाखू खाऊन थुंकत असतात. त्यामुळे बेसिन कायमच लालेलाल दिसून येत आहे. ही बाब अनेकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली असली तरी प्रशासन कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.