लोणी दि.२९( प्रतिनिधी):-प्रवरेत नेहमीचं अनेक उपक्रम सुरु असतात.या माध्यमातून विचारांचे मंथन होत असते.४१ वर्षाची सहकार महर्षी डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन रौप्यकरंडक वादविवाद स्पर्धेतून निसर्गनिर्मित आव्हानांना तोंड देण्यास मानव समर्थ आहे या विषयांतून झालेले मंथन उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्यश्री विखे पाटील महाविद्यालयाने आयोजित वादविवाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरणांत सौ.विखे पाटील बोलत होत्या.
या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधीमहाविद्यालयाच्या कु. ऐश्वर्या नवनाथ तनपुरे व सौरभ सुधीर औटे या स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील रौप्य करंडकावर आपले नाव कोरले.यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. बापूसाहेब भाकरे,संस्थेचे सहसचिव भारत घोगरे,प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे, संयोजन समितीचे अध्यक्ष डाॅ.शांताराम चौधरी, परीक्षक डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. जितेंद्र पाटील व डॉ. सुनिल चोळके यांचेसह डॉ. छाया गलांडे, डॉ कल्पना पलघडमल यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी वरिष्ठ गटातून अनुक्रमे प्रथम क्रमांक रितिका वसंत शेळके (शिवछत्रपती महाविद्यालय सिडको, छत्रपती संभाजीनगर), द्वितीय क्रमांक कु. ऐश्वर्या नवनाथ तनपुरे (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर), तृतीय क्रमांक बलभीम महाविद्यालय बीड येथील रोहन नामदेव चव्हण याने पटकाविला; तर उत्तेजनार्थ क्रमांक सात्रळ येथील पूनम लक्ष्मण गागरे हिला देण्यात आला. कनिष्ठ गटातून अनुक्रमे प्रज्ञा रेवणनाथ वाणी (प्रथम), पल्लवी सुनिल खंडागळे (द्वितीय) , साक्षी पंजाब येडे (तृतीय) तर श्वेता सुधीर सोनवणे उत्तेजनार्थ) बक्षिस प्राप्त केले.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वातावरणात घडणाऱ्या बदलांचा परिणाम म्हणून या पृथ्वीवर अनेक प्रकारची संकटे निर्माण होत आहेत. त्यात मानवाबरोबरच सारी जीवसृष्टीच धोक्यात येते की काय आशी परिस्थिती निर्माण होते. कधी अपरिमित बर्फवृष्टी, चक्रीवादळे, दुष्काळ, जलप्रलय, भूकंप व ज्वालामुखी अशा अनाकलनीय संकटांनी तर मानवाने निर्माण केलेल्या भौतिक सोयी- सुविधांच्या अस्तित्वापुढे मोठे आव्हान निर्माण होते. याशिवाय विविध विषाणू मानव प्रजातीवर अक्षरश: हल्ले करून मानवाला नेस्तनाबूत करण्याच्या भूमिकेतच असतात. अलीकडेच कोरोनाचे आलेले संकट हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. याशिवाय स्वाईन फ्लू, एड्स, देवीची साथ, प्लेग, मलेरिया, पटकी व कॅन्सर या आणि अशा अनेक असाध्य रोगांच्या साथीने भूतकाळामध्ये मानवजाती पुढे मोठेच आव्हान निर्माण केले होते. या सर्व बदलांचा परिणाम व त्यातून मानवाने केलेली प्रगती याचा आढावा घेतला. तर बापूसाहेब भाकरे यांनी नैसर्गिक आपत्ती व त्यातून मानवाने केलेली प्रगती यावर भाष्य केले. तसेच विज्ञानाच्या प्रगतीमुळे निसर्गनिर्मित आव्हानांचा अंदाज घेऊन; येणाऱ्या संकटाचा सामना करण्याचे कौशल्य, त्यासाठीची आयुध्ये निर्माण केली. अगदी निसर्गावर मात करण्याचे कसब त्याने प्राप्त केले. असे असली तरी हे सारे प्रयत्न खरोखरच मानवी प्रजातीच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरेल.
सुरुवातीला डॉ रामचंद्र रसाळ यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी डॉ. राजेंद्र सलालकर , प्रा. दशरथ खेमनर, डॉ मनोज पाटील, डॉ बाबासाहेब वाणी , प्रा विजय खाडे. डॉ विजय खर्डे, डॉ. श्रीकांत सुसर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुञसंचालन डाॅ.वैशाली मुरादे आणि प्रा.हर्षद खर्डे यांनी तर आभार डाॅ.शांताराम चौधरी यांनी मानले.



