संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत देशवासीयांच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या भारतीय सैन्यातील सर्व जवानांकरता कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून बचतगटातील महिलांनी बनवलेल्या 2100 तिरंगा राख्या भारतीय सैनिकांना पाठविल्या आहेत.
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात एकविरा फाउंडेशनच्या वतीने कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये 2100 तिरंगा राख्या भारतीय सैनिकांना पाठवण्यात आल्या यावेळी ब्रह्मकुमारी केंद्राच्या भारती दीदी, योगिनी दीदी, पद्मा दीदी, श्रीराम कुऱ्हे, व एकवीरा फाउंडेशनच्या सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या.
भारतीय सैन्य दलातील जवान देशवासीयांच्या रक्षणाकरता ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतात. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे विविध सण उत्सव मोठ्या आनंदाने सर्वजण एकत्रितपणे साजरा करतात मात्र अशावेळी हे सैनिक घरापासून हजारो किलोमीटर दूर सीमेवर असतात.
या सर्व सैनिक बंधूं साठी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दहा वर्षापासून बचत गटाच्या महिलांच्या राख्या पाठवल्या जातात.
यावर्षीची डॉ जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून येणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त तालुक्यातील महिलांनी बनवलेल्या तिरंगा रंगातील 2100 सीमेवर पाठवण्यात आले आहे
याप्रसंगी बोलताना डॉ थोरात म्हणाले की, सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक देशवाशियांचे कर्तव्य आहे. आपल्या घराघरापासून हजारो किलोमीटर दूर राहून ते आपले रक्षण करत असतात. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्यातील पवित्र सण असून या सणाच्या निमित्ताने तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांनी या सैनिक भावांसाठी पाठवलेल्या राख्या हा आनंदाचा क्षण आहे. प्रत्येक सैनिकाचा आपल्या सर्वांना सदैव अभिमान असल्याचीही त्या म्हणाल्या.
तर ब्रह्मकुमारी पद्मा दीदी म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत संवेदनशील पणे भावनिकतेने सर्वजण एकत्र कुटुंब पद्धतीने संगमनेर तालुक्यात वागत असेल सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही भावना अत्यंत चांगली असल्याचीही त्या म्हणाल्या
यावेळी एकविराच्या अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या