नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-दि.१७ रोजी पहाटे ०४:५० वाजण्याचे सुमारास कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, अहमदनगर शहरातील स्टेट बैंक चौकाकडुन जुने कलेक्टर कार्यालय बुथ हॉस्पीटल अहमदनगर रोड येथे अज्ञात इसम हे कत्तल करण्याकरीता व त्यांना चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अशारितीने दोरीने दाटीरेटीमध्ये दोन पीकअप मध्ये बांधलेल्या स्थितीत गोवंशीय जातीचे जनावरे घेवुन जाणार आहे.
अशी माहीती मिळाल्याने त्यांनी रात्रगस्तीवर असलेले अंमलदार यांना सदरबाबत माहिती कळवून खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने स्टेट बॅन्क चौकाकडून जुने कलेक्टर कार्यालय बुथ हॉस्पीटल अहमदनगर येथे जाणारे रस्त्यावर शोध घेतला असता दोन पांढ-या रंगाचे पिकअप क्रमांक एमएच १२ एमएक्स ९४२६ व एमएच १६ सीसी ८५९५ हे संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने गुन्हे पथकाने सदर दोन पिकअप वाहनास थांबवुन त्यावरील चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव. मन्नान इब्राहिम शेख वय- ५० वर्षे रा. घर नं. १८६० बेपारी मोहल्ला, झेंडीगेट अहमदनगर, गौस कुरेशी रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट अहमदनगर असे असल्याचे सांगीतले.
त्यांस त्याचेगाडी मधील काय माल असल्याबाबत विचारपुस करता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्या दोन पिकअप वाहनामध्ये २,४०,०००/-रु किमतीचे ८ लहान मोठे काळे पांढरे रंगाचे गोवंशीय जिवंत जनावरे तसेच ४,००,०००/-रु किचे पांढ-या रंगाचे दोन पिकअप असा एकुन ६,४०,०००/-रु किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून त्याचेविरुध्द कोतवाली पोस्टे गुरनं ९३१/२०२४ महाराष्ट्र प्राणी सरंक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(व),९ प्रमाणे प्राणि क्लेश प्रतिबंध अधिनियम सह सन १९६० चे कलम ११ प्रमाणे पोकॉ सतिश शिंदे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोहेको गणेश धोत्रे हे करीत आहेत,
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सोो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोसई/ महेश शिंदे, गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे,विशाल दळवी ,सतिश भांड,सलीम शेख,विक्रम वाघमारे, पोकॉ/अभय कदम, अमोल गाडे,सतीष शिंदे,अनुप झाडबुके, राम हंडाळ यांनी केली आहे.