spot_img
spot_img

साई सम्राट स्वीटचे आलिशान दालनाचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा 

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-शिर्डीतील द्वारका सर्कल चौकात साई सम्राट स्वीट नावाने नूतन मिठाईच्या आलिशान दालनाचा आज युवानेते डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.

शिर्डीतील मध्यवर्ती ठिकाणी शिर्डी नगरपरिषद अग्निशमन केंद्राच्या समोर असलेल्या या नूतन मिठाई दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ सुजय विखे पाटील,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांसह शिर्डीतील मान्यवर नेते मंडळी,विविध क्षेत्रातील मान्यवर,साईबाबा संस्थानचे अधिकारी वर्ग,मित्रपरिवार आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी फित कापून उद्घाटन केले आणि या नूतन साई सम्राट स्वीट मार्टला शुभेच्छा दिल्या

याप्रसंगी साई सम्राट स्वीटचे मालक सुदामराव शेळके,उदय शेळके,तुषार शेळके,योगेश शेळके आणि चालक जगदीश राठोड यांनी शिर्डीतील खवय्यांना एकाच दालनात मिठाई,बेकरीचे सर्व पदार्थ, चाट,पाणीपुरी असे विविध पदार्थांची मेजवानी मिळणार असल्याने एकदा अवश्य साई सम्राट स्वीटला भेट देत सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!