राहाता प्रतिनिधी :- स्थापनेनंतर 64 वर्षे उलटूनही संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर 1 कोटीचे कर्ज आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे महिना महिना पैसे मिळत नाहीत असा त्यांचा कारभार आहे त्या उलट अवघ्या काही वर्षातच सर्वोत्कृष्ट कारभार करून राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात अव्वल व आदर्श ठरली आहे.परंतू केवळ राजकीय अस्तित्वासाठी आज मत मागायला येणारे कोव्हीड संकटात कुठे होते? असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
राहाता बाजार समितीची १९ वर्षाची बिनविरोध निवडीची परंपरा बाहेरच्या काही मंडळींमुळे खंडित-पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे पार्श्वभूमीवर साकुरी येथील सिद्ध संकल्प मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या सभेत राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ अण्णासाहेब म्हस्के होते यावेळी गणेश सहकारी कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड रघुनाथ बोठे बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर जनसेवा मंडळाचे सर्व उमेदवार तसेच विविध संस्थांचे व संघटनांचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राहाता बाजार समितीची 19 वर्षाची बिनविरोध निवडीची परंपरा बाहेरच्या काही मंडळींमुळे खंडित झाली आहे शेजारच्या तालुक्यातील माजी मंत्री आता बाजार समितीच्या निवडणुकी निमित्ताने इकडे सभा घेताहेत परंतु कोविड काळात शेतकरी नागरिकांचे हाल होत होते तेव्हा साधे एखादे सेंटर तरी त्यांनी इकडे उघडले का ? ते इकडे फिरकले सुद्धा नाही व आता इकडचा पुळका दाखवताय ! त्यावेळी तुम्ही मंत्री होता तुमचे कोणी हात बांधले होते का? असा सवाल उपस्थित करत माजी मंत्री आ बाळासाहेब थोरात यांना मंत्री विखे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.
मंत्री विखे पाटील म्हणाले की संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना होऊन 64 वर्षे उलटली तर राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला 19 वर्षे झाली आहेत दोन्ही बाजार समितीचा पाच वर्षांचे कारभाराचा तुलनात्मक विचार केला तर राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीला 18 कोटीचे उत्पन्न झाले तर साडेपाच कोटी रुपयांच्या मुदत ठेवी बाजार समितीच्या आहेत त्यातुलनेत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला १३ कोटींचे उत्पन्न असून त्यांच्या ठेवी तर सोडा उलट १ कोटींचे कर्ज या बाजार समितीवर आहे चार भिंतीतील ही बाजार समिती असून तीचा बाजार समनापुरला भरतो येथे शेतकऱ्यांना महिना महिना पेमेंट ची वाट बघावी लागते वेळेवर पेमेंट होत नसल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये वारंवार भांडणे होतात अशी परिस्थिती संगमनेरची आहे त्या उलट लोकाभिमुख व शेतकरी हिताचा कारभार विविध उपक्रमाद्वारे राहाता बाजार समितीने राज्यात नावलौकिक प्राप्त केला असून,देशभरातील बाजार भाव आहेत हे शेतकऱ्याला राहाता येथे जागेवर समजत आहे. शेतकरी हिताला प्राधान्य असल्याने शेतकऱ्यांची मोठी विश्वासार्हता या बाजार समितीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीने कोविड काळात शेतकऱ्यांना बाजार समितीने मोठा आधार दिला डाळिंब कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्याने डाळिंब व कांद्याची सर्वाधिक आवक येथे होते कोविड काळात लोणीचा जनावरांचा बाजार पशुपालकांसाठी सुरू होता त्याचा शेतकरी व पशुपालकांना फायदा झाला मागील पाच वर्षात जनावरांच्या बाजारात साडेसातशे कोटी रुपयांची उलाढाल झाली पशुपालकांना जनावरांची चांगली किंमत मिळाली आपल्या सर्वोत्कृष्ट कारभाराद्वारे राज्यात राहाता बाजार समिती अवल व आदर्श ठरली आहे.याची जाणीव सर्व सभासदांना आहे प्रवरा दूध संघाचे वाटोळे झाले ज्यांनी संस्था मोडून खाल्ल्या असे लोक चांगल्या कारभारा बद्दलची सध्या भाषण करताहेत हे मोठे दुर्दैव आहे.
राहाता तालुका बाजार समितीची स्थापनेस 19 वर्षे झाले तेव्हापासून बिनविरोध निवडणूक होत होती मात्र काही मंडळींना हे चित्र आवडले नाही म्हणून त्यांनी निवडणूक लावली बाहेरचे लोक त्यांना रसद पुरवत आहे परंतु शेतकरी तसेच मतदार बांधवांना येथील सर्व कारभार व परिस्थिती माहीत असल्याने विरोधी पॅनलचा धुव्वा उडवतील यात शंकाच नाही अगदी विरोधी पॅनलच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील व बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार राज्यात एक नवा इतिहास घडवतील डिपॉझिट जप्त होईल.
कारभारात दोष अथवा चुका असतील तर जरूर दाखवले पाहिजे मात्र सर्व काही सुरळीत व राज्यात अव्वल व आदर्श कारभार असताना बाजार समितीची निवडणूक लावून राजकारण करणं चुकीचं असल्याचंही यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले या वेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड रघुनाथ मोठे यांनी केले तर आभार बाजार समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब जपे यांनी मानले.



