लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालायात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२४ व्या जयंती दिनानिमित अभिवादन करण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य शरद आहेर,संदिप घोगरे,मिलींद आहेर,भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल घोगरे,गणेश आहेर,अशोक कोरडे,संतोष आहेर आदीच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायतीचे कर्मचारी अंगणवाडी सेविका यावेळी उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहीला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी स्थापन करून सहकारी चळवळ सुरू केली.सहकार चळवळीतेन शेतकऱ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना उत्तेजन मिळाले व ग्राम विकासाला चालना मिळाली अशा भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केल्या.
पद्मश्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकऱ्यांचे हित जपण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यातून सहकारी चळवळीत समाजाच्या प्रत्येक घटकाचा समावेश होईल हेच भावी विशाल सहकारी जगताचे स्वप्न साकार होईल आणि ते आज साकार झालेले आहे. असेही मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.