4.6 C
New York
Thursday, December 5, 2024

Buy now

spot_img
spot_img

अशोक नवले यांच्याविरुद्ध मानहानीचा 2 कोटींचा दावा ठोकणार- मिलिंद कानवडे नवले यांचे सर्व आरोप बिनबुडाचे व राजकीय उद्देशाने पत्रकार परिषदेत कानवडे यांच्याकडून तपशीलवार खुलासा

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्हा परिषद सदस्य म्हणून संगमनेर खुर्द गटात अत्यंत प्रामाणिकपणे व कार्यक्षमपणे आपण काम केले आहे. मात्र काही लोकांना हे काम सहन झाले नसून त्यांनी व्यक्तीदोषातून व राजकीय उद्देश ठेवून आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. हे सर्व आरोप खोटे असून अशोक नवले यांच्याविरुद्ध आपण बदनामी व मानहानीचा 2 कोटींचा दावा ठोकणार असल्याची माहिती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी दिली आहे शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी संगमनेर गटातील सुमारे 500 युवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत बोलताना मिलिंद कानवडे म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनानंतर मी रियल इस्टेट या व्यवसायात काम सुरू केले. अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय केला. गोरगरिबांना मदत केली. यातून मोठा मित्रपरिवार जमा झाला. या कामातून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मला संगमनेर खुर्द या जिल्हा परिषद गटातून काम करण्याची संधी दिली. मागील पाच वर्षाच्या काळात प्रत्येक गावासाठी विविध विकासाच्या योजना राबवताना रस्ते ,आरोग्य ,शिक्षण यासाठी मोठे काम केले. याचबरोबर व्यक्तिगत अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला मदत केली .सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबवली असून त्यांचे काम सुरू आहे. चांगला जनसंपर्क आणि सातत्याचे काम यामुळे मागील वर्षी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे आली.

समाजकारण, राजकारण ,शेती, आणि कुटुंब सांभाळताना आपण अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. परंतु चांगले काम असताना काही लोकांना हे काम पहावले नाही. त्यांनी राजकीय देशातून आरोप करणे सुरू केले.

यातूनच काही आर्थिक उद्देश ठेवून संगमनेर खुर्द येथील अशोक तुकाराम नवले यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की आदिवासींचे खोटे दाखले घेऊन खोटी नोंद केली आहे. परंतु यामध्ये वस्तूस्थिती अशी आहे की अशोक तुकाराम नवले राहणार संगमनेर खुर्द यांनीच स्वतः तलाठी यांच्याकडे अर्ज देऊन सदर व्यक्तींची आदिवासी म्हणून नोंद करावी असा अर्ज दिलेला आहे. आणि याचा आपल्याकडे पुरावा आहे.

या प्रकरणांमध्ये त्यांनी अनेक वेळा काही मागणी केली .परंतु आपण सातत्याने प्रामाणिक काम केले असल्याने मी त्यांना नाकार दिला . याचा राग येऊन राजकीय उद्देश ठेवून त्यांनी विनाकारण बिनबिडाचे व विनाधार पुराव्याचे आरोप केले. खरे तर अशोक नवले यांनी सरकारलाही फसवले असल्याचे निदर्शनास आले आहे.

या आरोपांमुळे माझे व माझ्या कुटुंबीयांचे मानसिक स्वास्थ खराब झाले असून हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे . परंतु नवले यांचा आर्थिक उद्देश असल्याने त्यांच्या या आरोपांमुळे माझ्या सहकाऱ्यांनी याला सडेतोड उत्तर देण्यासाठी सातत्याने आग्रह केला. खरे तर ही व्यक्ती अदखलपात्र आहे. परंतु सत्य जनतेसमोर यावे या मताचा मी कायम असल्याने आज सर्वांसमोर याचा खुलासा करत आहे.

माझ्या झालेल्या बदनामीचा व मानहानीचा मी अशोक तुकाराम नवले यांच्याविरुद्ध 2 कोटींचा दावा ठोकणार आहे असेही मिलिंद कानवडे यांनी म्हटले आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!