पुणे ( जनता आवाज वृत्तसेवा ):-एका अल्पवयीन 13 वर्षीय शाळकरी मुलीस बळजबरीने दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिडित मुलीच्या मित्रांसह एका मैत्रीणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेले आराेपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पिडितमुलीच्या वडिलांनी समर्थ पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार याबाबत अल्पवयीन आराेपी विरुद्ध भादंवि कलम 363, 376, 328, 506, 34 , पाेस्काे 4,8,12 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि एका मुलाची मागील काही दिवसांपासून ओळख निर्माण झाली हाेती. त्याने मुलीला वेगवेगळे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याने तिच्यावर बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मुलीच्या आराेपी अल्पवयीन मैत्रिणीने पिडित मुलीस फूस लावून एका मित्राच्या घरी रिक्षाने नेले. त्याठिकाणी तिला बळजबरीने दारु पाजली गेली. त्यानंतर दारुच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. मित्राबरोबर असलेल्या एकाने यावेळी मुलीचे मोबाइलवर छायाचित्रे काढल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रारीत सांगितले आहे. पोलिस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड याबाबत पुढील तपास करत आहेत.
वारजे भागात एका मुलीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अवि कालीदास पोपळघट (वय 20, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी,पुणे) याला अटक करण्यात आली. याबाबत एका मुलीने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलीची आणि आरोपी पोपळघटची ओळख होती. पोपळघटने मुलीला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर मुलीवर त्याने मुलीवर बलात्कार केला. मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती समजली. तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे पुढील तपास करत आहेत.