राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):- महंत रामगिरी महाराजांच्या समर्थ सकल हिंदू समाज व वारकरी संप्रदायच्या वतीने राहाता शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुदर्शन न्यूज चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके म्हणाले की महंत रामगिरी महाराजांना झेड प्लस ची सुरक्षा देण्यात यावी. महाराजांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे
महाराष्ट्रात हिंदू लोकांवर दबाव आणून धर्मांतर केले जात आहे. धर्मांतर बंदी कायदा लागू करावा. गो हत्या बंदी करावी तसेच विविध ठिकाणी होत असलेल्या गोहत्या कारखान्यांवर छापे टाकून संबंधित लोकांवर कारवाई करावी.लव जिहादच्या घटना सातत्याने होत आहे या घटकांना पायबंद व्हावा म्हणून कठोर कायदे करावे. लँड जिहाद विरोधी कायदा करावा. वारकरी व संतांना कमी समजू नका एक टाळ कितीतरी डोके फोडू शकतो हे इतर समाजाने लक्षात ठेवावे.इथून पुढे हिंदू समाजाने असेच एकत्र येत अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन चव्हाणके यांनी केले.
यावेळी साक्षी भागवत म्हणाली की लाडकी बहिणींवर अत्याचाराच्या घटना या वाढत आहे या अत्याचारात बहिणीचा नाहक आपल्या जीवाला मुकावे लागते तर लाडकी बहीण आर्थिकदृष्ट्या सक्षम करू नका तर बहिणीला संरक्षित करा हिंदू समाज शांतता मानणारा आहे तो शांत प्रियच राहू द्या असे भागवतीने सांगितले.
हिंदू सकाल हिंदू समाजाच्या वतीने सागर बेग,बजरंग दलाचे शुभम मुर्तडक यांनी आपले विचार मांडले. महंत ह भ प रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री.वीरभद्र महाराज समोरील प्रांगणात हिंदू बांधव एकत्र जमले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात झाली झाली. दरम्यान ११ वाजेच्या सुमारास राहाता शहरातून भजन कीर्तनाचा टाळ मृदंगाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय,भारत माता कि जय ,अशा घोषणा देत मोर्चा सुरुवात होऊन शहरातील गळवंती मार्गाने हा मोर्चा चितळी रोड, नगर मनमाड रोड व वीरभद्र मैदानात येथे सभा झाली.
नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात अखंड सप्ताह मध्ये १५ ऑगस्ट रोजी महंत ह भ प.रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले.तसेच त्यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारावरून भारतातल्या हिंदू समाजाला मजबूत राहण्याचे आवाहनही केले होते.
महंत रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही तासानंतर त्यांच्या प्रवचनाचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ठीक ठिकाणी त्याचे पडसाद उलटायला सुरुवात झाली मुस्लिम समाजाने रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केली,मुस्लिम समाज या बाबत अधिक आक्रमक झाला होता काही ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. या सर्वांचे पडसाद राहाता शहर बंद ठेवत उमटले त्याला सर्व व्यवसायिकांनी आपले दुकाने शंभर टक्के बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. विशेष म्हणजे आवश्यक सेवा देणारे व्यवसायिकांनी सुद्धा आपले व्यवसाय बंद ठेवत पाठिंबा दिला.
तहसीलदार अमोल मोरे यांना हिंदू सकल समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी मोर्चासाठी उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे,ए.पी.आय.कमलाकर चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.