राहता (जनता आवाज वृत्तसेवा ):- राहाता तालुक्यातील एकरुखे गावातील भाऊसाहेब वायकर यांच्या घरात नविन गँस टाकी लावण्यासाठी त्याचे सफेद झाकण उघडताच त्यातुन मोठ्या प्रमाणात गँस गळती सुरु झाली ही बाब भाऊसाहेब वायकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गँस गळती रोखण्याचा प्रयत्न करुन ही गळती सुरुच राहील्याने सुरक्षीतचा म्हणुन त्यांनी गँस टाकी घराबाहेर आणत त्यांनी पाण्यात फेकली मात्र एव्हान गँसचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला. हा गॕस घराबाहेर असलेल्या चुल्ही पर्यंत पोहचल्याने गँसने पेट घेतला त्यामुळे आसपास असलेले नऊ जण आणि चार जनावरे होरपळ्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
जखमींना प्रवरा ग्रामिण रुग्णालयात त्वरित हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत तर जनावरांणा राहाता येथिल पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन वेंदे व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.नितिन निर्मळ यांनी त्वरीत घटनास्थळी येत उपचार केले आहेत तर यामध्ये भाऊसाहेब वायकर हे गँस गळती होत असलेले सिलेंडर घरा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांचा पाय अडकल्याने त्यांचा पाय मोडला असुन त्यांच्यावर देखील लोणी येथील प्रवरा रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत
दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पा.यांनी या जखमींची त्वरीत रुग्णालयात जावुन भेट घेतली असुन वैद्यकीय अधिकाऱ्यांची देखील चर्चा करुन त्यांच्या प्रकृती विषयी माहीती घेतली आहे.
तर याप्रसंगी एकरुखे येथील सरपंच जितेंद्र गाढवे गणेश कारखान्याचे संचालक अनिल गाढवे कृषी उत्पन्न बाजार समीती संचालक जालिंदर गाढवे कृषी उत्पन्न बाजार समीती मा. संचालक देवेंद्र भवर सोपान कासार,अनिल गाढवे, विनोद गाढवे,राजेंद्र वायकर, विजय वायकर यांनी घटनास्थळी त्वरीत येवुन जखमींना उपचारासाठी हलविण्यास मदत केली