8.4 C
New York
Tuesday, November 19, 2024

Buy now

spot_img
spot_img

दुर्गापूर येथील अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरु

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-दुर्गापूर येथील अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास शुक्रवार पासून प्रारंभ झाला. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनासह महाप्रसाद आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

योगीराज गंगागिरीजी महाराज, ब्रम्हलिन नारायणगिरीजी महाराज, सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज आणि उंबरेश्वर देवस्थानचे मठाधिपती महंत दत्त गिरीजी महाराज आणि ह.भ.प. मुकेश महाराज तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणांचा प्रारंभ चिंचपूर येथील ह.भ.प मग्नानंद गिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. यावेळी दुर्गापूरचे सरपंच नानासाहेब पुलाटे, उपसरपंच नबाजी रोकडे, बाबासाहेब पुलाटे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब फुलाटे, सेवा संस्थेचे अध्यक्ष कचरू पुलाटे, वेणूनाथ पुलाटे,ह.भ.प मुकेश महाराज तांबे यांच्यासह भजनी मंडळ आणि भाविक उपस्थित होते.

या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे काकडा भजन सकाळी ९ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ४ ते ५ प्रवचन सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ७ ते ९ या वेळेमध्ये हरिकीर्तन आणि त्यानंतर नऊ ते दहा महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शुक्रवारी ह.भ. प. सुनील महाराज पवार, शनिवारी ह. भ .प .नारायण महाराज उबाळे, रविवारी ह. भ. प. अर्जुन महाराज चौधरी, सोमवारी ह. भ .प. श्रावण महाराज, मंगळवारी ह.भ.प. मधुसूदन महाराज बुधवारीह.भ.प. अमोल महाराज गाढे, गुरुवारी

ह. भ. प. राजेश्वर गिरीजी महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहेत गुरुवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण पूजन आणि दीपवंदनाचा कार्यक्रम होणार असून शुक्रवार दि. ऑगस्ट  २०२४ रोजी सकाळी१० वाजता सरला बेट येथीलह.भ.प. गणेश महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दुर्गापूर ग्रामस्थ आणि भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!