लोणी दि.२७ (प्रतिनिधी):-संवाद कौशल्य यशाचा अतिशय महत्वपूर्ण यशाचा मार्ग आहे. व्यक्तीमत्व हे समृद्ध होण्यासाठी वत्कृत्व आणि वादविवाद स्पर्धांना विशेष महत्व असून पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जीवनपट हा तरूणांसाठी प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन संगमनेर महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अनंत दिवेकर यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धाच्या उद्याटन प्रसंगी डाॅ. दिवेकर बोलत होते. यावर्षी निसर्गनिर्मित आव्हानांना तोंड देण्यास मानव समर्थ आहे ! हा प्रस्ताव वादविवादसाठी ठेवला आहे.यावेळी संस्थेचे सह सचिव भारत घोगरे,साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य,संस्थेचे अतांञिक विभागाचे संचालक प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे,स्पर्धेचे कार्यध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी, डाॅ.बी.डी.रणपिसे,डाॅ.सुनिल वाबळे,डाॅ.राजेंद्र सलालकर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. दिवेकर म्हणाले, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी दुरदृष्टीतून सहकारी चळवळीतून ग्रामीण विकास साद्य केला. त्याचे विचार समजून घेत पुढे जात असतांना वादविवाद स्पर्धेतून आपण प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. जय-पराजय हा होत असतो पण यातूनच आपली जडण घडत असते असे सांगुन या स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सहसचिव भारत घोगरे यांनी पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाजूला ठेऊन स्पर्धेला तोड द्यावे. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून पुढे जाण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे यांनी केले. पद्मश्री विखे पाटील वादविवाद स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ.शांताराम चौधरी प्रस्तावाची भूमिका विशद करून स्पर्धेची माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. हर्षल खर्डे, डॉ. वैशाली मुरादे यांनी तर आभार डॉ. बी. डी. रणपिसे यांनी मानले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील वादविवाद स्पर्धेत राज्यभरातून ३९ महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले आहेत. नियोजबध्द स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहीले जाते, मागील ४१ वर्षापासुन ज्वलंत विषयांवर वादविवाद स्पर्धेधून मंथन होते.