spot_img
spot_img

शेवगावमध्ये धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरुन हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस ठाण्यात

शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरुन हत्या केल्याची घटना शेवगाव शहरात घडली आहे. शुक्रवार दि. २३ रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान पतीने पत्नीची गळा चिरुन हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस ठाण्यात दाखल झाला.

सचिन दिलीप काथवटे (वय 35, रा. ब्राम्हण गल्ली, शेवगाव) असे आरोपी पतीचे नाव आहे. या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शेवगाव शहरातील ब्राम्हणगल्ली येथे आरोपी सचिन दिलीप काथवटे हा पत्नी सह वास्तव्यास आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहे.

शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती सचिन काथवटे हा स्वतः पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर शेवगाव पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!