लोणी दि.२७ प्रतिनिधी:-सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रवरा परिवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थाच्या कार्यालयात पुण्यतिथी निमित्ताने पद्मश्रीच्या अभिवादनाचे कार्यक्रम संपन्न झाले.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कारखाना कार्यस्थळावरील स्मृतीस्थळास महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडू यांच्यासह संचालक, विविध संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. लोणी बुद्रुक येथील अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील, किसनराव विखे , संपतराव विखे, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, माजी सिनेट सदस्य अनिल विखे, लक्ष्मण बनसोडे, राहुल धावणे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते