नगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- एका निमसरकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याची बदली झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. परंतु त्या अधिकार्याने काही कर्मचाऱ्यांना घरगुती कामासाठी बोलविण्यात आलेले असून सरकारी कार्यालयातील बॉक्सचा वापर केला जात असल्याची कर्मचाऱ्यात चर्चा सुरु आहे. सोबत काहींनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार केली असल्याची चर्चा सुरु आहे.
जिल्ह्यातील एका निमशासकीय कार्यालयात एका अधिकाऱ्याने गेल्या काही दिवसापासून कर्मचाऱ्यांना अपमास्पद वागणूक दिल्याने त्याच्यावर काही कर्मचारी नाराज आहे. या अधिकाऱ्यांच्या अशा प्रकारामुळे काहींचे मनोधैर्य खचले होते. याबाबत काहींनी संबंधिताला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र माझीच कामाची स्टाईल अशी आहे असे अधिकाऱ्याकडून उत्तर दिलेले आहे.
याबाबत काहींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे. त्यातच त्या अधिकाऱ्याची बदली झाली आहे. त्यामुळे सर्वजण सुखावले आहे. या अधिकार्यांच्या बदलीची माहिती समजताच कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला असून काहींनी पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला.
या अधिकाऱ्यांने त्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना बोलवून घरातील सामान पॅकिंग करण्याच्या सूचना दिल्या असल्याची चर्चा कर्मचाऱ्या सुरू आहे. यासाठी सरकारी कार्यालयातील काही खोके वापरले जात असल्याची ही चर्चा आहे. या शासकीय कार्यालयाच्या आवरत असलेले सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन काही जण थेट वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्येे सुरु आहे.