संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- संपूर्ण देशासाठी सहकाराचे आदर्श मॉडेल ठरलेल्या अमृत उद्योग समूहामधील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 ते 1 सप्टेंबर 2024 या कालावधीत कारखाना कार्यस्थळावरील कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.
स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर संगमनेर मधील अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांचे कामकाज हे देशासाठी उत्तम मॉडेल ठरले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या सर्व सहकारी संस्थांमधून तालुक्याच्या ग्रामीण विकासासह शेतकरी, उत्पादक ,नागरिक ,महिला, व्यापारी, कामगार या सर्वांचा विकास साधला जात असून या सहकारी संस्थांमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.
या आदर्शवत सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 30 ऑगस्ट 2024 ते 31 सप्टेंबर 2024 या काळात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील अमृतेश्वर मंदिराजवळील प्रांगणात काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे व तालुक्यातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.शुक्रवारी 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वा. कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती शंकरराव खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर सकाळी 11 वा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुधाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शनिवारी 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वा. शेतकी संघाची वार्षिक सभा चेअरमन संपतराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली तर सकाळी 10 वा. हरिश्चंद्र फेडरेशनची व गरुड कुक्कुटपालन ची वार्षिक सभा चेअरमन राजेंद्र गुंजाळ व राजेंद्र कडलग यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
तर सकाळी 11 वाजता संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याचबरोबर रविवारी 1 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वा.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन प्रतापराव उर्फ बाबा ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या सर्व वार्षिक सर्वसाधारण सभांना आमदार सत्यजित तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, ॲड.माधवराव कानवडे, बाजीराव पा.खेमनर,सौ.दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, यांच्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी सभासद व उत्पादक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन संतोष हासे, दूध संघाचे व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर, बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे, शेतकी संघाचे व्हा.चेअरमन सुनील कडलग, उपसभापती गीताराम गायकवाड,कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह कारखाना, दूध संघ, बँक, शेतकी संघ, हरिश्चंद्र फेडरेशन, गरुड कुक्कुटपालन या सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केले आहे.