राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- भारतीय अध्यात्मिक सांस्कृतिक पंरपरेत रूद्र पूजेच महत्व खूप मोठे आहे. आर्ट ऑफ लिव्हीग परीवाराने रूद्र पूजेतून भक्ती आणि प्रसन्नतेची अनुभूती मिळत असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रावणी सोमवारचे औचित्य साधून राहाता येथे आर्ट ऑफ लिव्हींग परीवाराच्या वतीने रुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते. श्री.श्री.रविशकंरजी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी आयोजित केला गेला. या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या. परीवाराचे अध्यात्मिक गुरू स्वामी चैतन्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या रूद्र पूजेचा अध्यात्मिक सोहळा संपन्न झाला. स्वामी ब्रम्हचैतन्य महाराज यांचा मंत्री विखे पाटील यांनी सत्कार केला. आर्ट ऑफ लिव्हीग परीवाराच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, आर्ट ऑफ लिव्हीग परीवाराने समाजातील प्रत्येक घटकाला सामवून घेत अध्यात्मातून आत्मिक आनंद मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. रुद्र पूजेचा संकल्प सुध्दा एक वेगळी अनुभूती देणारा असून, रूद्र पूजा म्हणजे भक्ती आणि प्रस्नानतेच प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले.
रूद्र पूजा करण्याचे भाग्य किंवा त्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने आत्मिक शातता आणि प्रसन्नता मिळतेच. श्री.श्री.रविशकंरजी यांनी आपल्या कार्यातून हाच संदेश संपूर्ण जगाला दिला असल्याचे सांगून या अध्यात्मिक सोहळ्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृती आणि परंपरेचे महत्व अधिक वृध्दींगत होण्यास मदत झाली असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केला. आर्ट लिव्हीग परीवाराचे सुनिल सदाफळ यांनी या रूद्र पूजेची परंपरा कायम राखल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे विशेष अभिंनदन केले. या कार्यक्रमास नागरीक तसेच आर्ट ऑफ लिव्हीग परीवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.