26.6 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ.प्राजक्त तनपुरे यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-३१ ऑगस्ट  रोजी सकाळी ९ ते ५ वाजता सिंधुदूर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला. या घटनेमुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या भ्रष्टाचारी व असंवेदनशील सरकारच्या विरोधात आ. प्राजक्त तनपुरे यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे.

तरी या आंदोलनास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार )शहराध्यक्ष संतोष आघाव, तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे कार्याध्यक्ष भारत तारडे,तसेच युवकांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर यांनी केले आहे.

सदर लाक्षणिक उपोषण शनिवार, दि.३१ ऑगस्ट  रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत बाजार समिती गेट समोर राहुरी येथे करण्यात येणार असून या तरी या उपोषणास जास्तीत जास्त शिवप्रेमींनी पाठींबा व्यक्त करण्याकरिता उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले आहे.

या प्रसंगी सकाळी ११ वा. शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे व दुपारी ४ वा. व शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे व्याख्यान होईल.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!