शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा ):-शेवगाव नगरपरिषदेसमोर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी शेवगाव नगर परिषद कार्यालय समोर आज गुरुवार २९ पासून आपले काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना या संघटनेच्या कर्मचारी व अधिकारी यांनी आज राज्यभर काम बंद आंदोलन चालू आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायती मधील २००५ नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्या घेऊन आज राज्यभर संवर्ग अधिकारी वर्गातील जवळपास ३,००० अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेतील ६०,००० वर कर्मचारी संपावर गेले आहेत.
यावेळी शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचारी ही ह्या काम बंद आंदोलन सुरू केली आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली व शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सुनील पगारे, कार्यालयीन अधीक्षक, अर्जुन बर्गे, अंतर्गत लेखापाल, अर्जुन तोगे, संगणक अभियंता, समाधान मुंगसे, स्थापत्य अभियंता, भाऊसाहेब जोगस, कर निरीक्षक, शरद लांडे, लिपिक, विशाल डहाळे, लिपिक, मनोज लांडे, लिपिक, गोरख काळे, लिपिक, विजय जाधव, लिपिक, अमोल गुंजाळ, लिपिक, राम शेळके, लिपिक, हरीश भागवत, लिपिक इत्यादी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला.