शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा ):-सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर केली जात असलेली अर्वाची भाषेतील टीका ताबडतोब थांबवण्यात यावी. तसेच या गोष्टीचा निषेध म्हणून शेवगाव तालुका सर्व वारकरी मंडळाच्या वतीने शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगळे सांगडे यांना आज रोजी निवेदन देण्यात आले.
यावेळी वारकरी मंडळी यांच्याकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदरणीय महाराजांनी प्रवचनात मांडलेला विषय ध्यानात न घेता त्या गोष्टीचा विपर्यास करण्यात आला. फक्त मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी मुस्लिम मौलाना जे बोलले आहेत तेच वक्तव्य महाराजांनी केले. त्यात गैर काही आहे असे आम्हा वारकरी मंडळीला वाटत नाही. तरीसुद्धा महाराजांवर वेगवेगळ्या ठिकाणी अर्वाचे भाषेत टीका होत आहे. निषेध आणि मोर्चे निघत आहेत. वारकरी संप्रदायातील व्यक्तींचा या माध्यमातून अपमान होत आहे. त्यांचे चरित्र हनन होत आहे. ही बाब वारकरी संप्रदाय सहन करणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.तात्काळ परवाच्या भाषेत होणाऱ्या टीका थांबविण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी निवेदन नायब तहसीलदार दीपक कारखिले यांनी स्वीकारले. यावेळी राम महाराज झिंजुर्के, श्री जोग महाराज संस्थान आखेगाव, चंद्रशेखर महाराज मुरदारे, विधानसभ प्रमुख अध्यात्मिक आघाडी भाजपा शेवगाव पाथर्डी, मारुती महाराज झिरपे, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान चापडगांव, ज्ञानेश्वर महाराज गावडे, रामनाथ महाराज शास्त्री,पावन गणपती संस्थान ,थाटे, ज्ञानेश्वर महाराज बटुळे, संत नारायण महाराज संस्थान धावनवाडी, हरिश्चंद्र महाराज व्यवहारे, अशतोष डहाळे,तालुका अध्यक्ष शिवसेना शिंदे गट, जगदीश धुत, डॉ कुष्णा देहाडराय, डॉ निरज लांडे, काकासाहेब डोंगरे, बाप्पू काटे, अशोक जगताप, लक्ष्मण काशिद, प्रशांत खरड, राजाराम देहाडराय, संभाजी पुरनाळे, विजय काथवटे, चंद्रकांत मोहिते, संदीप खरड, नारायण काळे, सुभाष बरबडे, हरी महाराज घाडगे, ज्ञानेश्वर महाराज गावडे, राजाराम महाराज देहाडराय सह इतर वारकरी संप्रदायातील संप्रदायातील मंडळी यावेळी हजर होते.