श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-हिंद सेवा मंडळाच्या क . जे . सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने दि. २० तें ३१ महावाचन उत्सव २४ उपक्रम साजरा करण्यात आला .
मराठी भाषेतील विविध साहित्य, कथा कादंबरी आत्मचरित्र, इतिहास विज्ञान, पुस्तकांचे वाचन करणे , वाचन केलेल्या पुस्तकांचा सारांश लेखन करणे या उपक्रमात ९०० विद्यार्थांनी सहभाग घेतला . इ.५ वी ते १२ वी विद्यार्थ्यांनी वाचन लेखन केले . शालेय समितीचे अध्यक्ष संजय छल्लारे प्राचार्य भूषण गोपाळे सेवक प्रतिनिधी कल्याण लकडे हिंद सेवा पतपेढी संचालिका स्मिता पुजारी जेष्ठ शिक्षक सुरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महावाचन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
महावाचन उत्सव उपकम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे ग्रंथपाल अशोक खैरे, बाबा वाघ,अनिल चोभे, विनायक चितळकर, प्रशांत शेकटकर, संकेत गंधे, उर्मिला कसार, संतोष सोले यांनी परिश्रम घेतले . सुत्रसंचालन रमेश धोंडलकर यांनी केले.



