5.4 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

नेतृत्व लाईन वर येत नसेल तर धक्का द्यावाच लागेल- माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

कोल्हार प्रतिनिधी :- नेतृत्व लाईन वर येत नसेल तर धक्का द्यावाच लागेल राहाता तालुक्याच गेल्या अनेक वर्षांपासून पासून पाहतो त्याच त्या इमारती बाजार पेठेत अवकाळी आल्यासारखे वाटते संगमनेर मध्ये येवुन पहा बाजारपेठ फुललेली दिसेल तालुक्याला चांगल्या नेतृत्वाची गरजआहे . येथील जनता दबाव तंत्राच्या नेतृत्वा खाली काम करत असल्याने नेतृत्व जर लाईन वर येत नसेल तर त्यांना धक्का द्यावेच लागेल . महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता विखेंच्या होम पिचवर मा महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चौफेर फटकेबाजी केली. 

 

                 कोल्हार भगवतीपुर येथे राहता कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन मंडळाचा प्रचाराचा शुभारंभ व मतदारांचा मेळावा बहुतेक देवी मंदिर नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्या प्रसंगी मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरामपूर दूध संघाचे मा. चेअरमन रावसाहेब पा. म्हस्के माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी शिवसेना मंत्री बबनराव घोलप राष्ट्रवादीचे काँग्रेस आ. निलेश लंके, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पा. कडू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.एकनाथ बंद कर सुहास वहाडणे, लोणी खु सरपंच जनार्दन पा.घोगरे, प्रभावती ताई घोगरे, लता डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख सुधीर म्हस्के प्रभाकर खर्डे सचिन कोते आदिजन यावेळी उपस्थित होते 
       यावेळी मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पॅनल उभा न राहून देण्यासाठी विरोधकांनी भरपूर प्रयत्न केले. कृषी उत्पन्न बाजार समितीत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघात दहशतीचे राजकारण करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम इथल्या नेतृत्व करत आहे . पण कोल्हार चे लोक स्वाभिमानी आहे. दबाव तंत्राला गाडण्याच काम येत्या निवडणुकीत तुम्हा आम्हला करावयाच आहे. राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार याची सुरुवात राहाता तालुक्यातून करावयाची असल्याचे माजी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात म्हणाले 
      राज्यातील भाजप सरकार दबाव तंत्राचा वापर करून विरोधकांच्या मागे सीबीआय इडी च्या धमक्या देऊन सत्ता काबीज करत आहे हे फार काळ चालणार नाही राज्य वेगळा दिशेने वाटचाल करत आहे भविष्यात याची किंमत मोजावी लागेल या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायला वेळ नाही अवकाळी पावसाचे नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले ह्या भाजप सरकारला सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांच्या काही घेणे नाही.धन दांडग्यांचं सरकार आहे यावेळी यावेळी नगर मनमाड राज्य मार्ग विषय बोलताना माजी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात म्हणाले की देशाचे रस्ते जोडण्याचे काम पूर्णतः कडे वाटचाल चालु असताना नगर कोपरगाव या रस्त्याचे घोडं कुठं आडल याचं गौड बंगाल आम्हाला काही समजेना असा असा टोला विरोधकांना लगावला . आम्ही आमच्या आम्ही आमच्या मतदारसंघात घरचे दहशतीचे राजकारण केलं नाही सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचे काम आम्ही आमच्या मतदारसंघात करतो. आम्हाला विरोधकाची भीती नाही तो मोठा झाल्यावर माझ्या विरोधात उभा राहील याची देखील आम्हाला भीती नाही ह्याच्या उलट राहता तालुक्यात परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यां मोठा होऊन द्यायचा नाही सर्वसामान्य माणूस मोठा झाला तर विरोधक तयार होतील ह्याची भीती विरोधकांना आहे . दहशतीचे वातावरण संपवायचं असेल तर महा विकास आघाडीशिवाय पर्याय नाही .येत्या निवडणुकीत विधानसभा असो लोकसभा असो सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या सरकारला निवडून देण्याची आवाहन मा. मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली 
                  आमदार निलेश लंके बोलताना म्हणाले की दबाव तंत्राला बळी न पडता महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी पर्वतन मंडळाच्या सर्व उमेदवारांना छत्री या चिन्हावर उभे असलेल्या शेतकरी परिवर्तन मंडळाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या रात्र वैऱ्याची आहे आपल्या हातात भरपूर वेळ आहे तेव्हा कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा कुठलीही अडचण आली तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दबाव तंत्राच्या ला बळी पडू नका तुम्हाला फोडण्यासाठी वेगवेगळी आमिष दाखवले जातील पैसे जरूर घ्या काम मात्र महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन मंडळालाच करा. 
   
….
 आमदार निलेश लंके कार्यक्रम स्थळी उशिरा आल्याने माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाषण चालू असताना म्हणाली अलीकडे नवीन आमदारांना उशिरा यायची सवय लागली त्यांची लोकप्रियता देखील वाढत चालली आहे 
 आमदार निलेश लंके पाटील आपल्या भाषण चालू असताना म्हणाले साहेब मी सामान्य आमदार आहे आमची जनता गाडी आहे . कोणी हाथ केलं की थाबवच लागत म्हणूनच लोक लोकप्रिय आमदार म्हणून ओळखतात. असे म्हणताच एकच हसा पिकला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!