3.1 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक यांच्यावर गोळीबार या घटनेमध्ये नगरसेवक गंभीर जखमी .

पुणे (जनता आवाज वृत्तसेवा):- शिक्षणाचे माहेरघर म्हणून समजले जाणारे पुण्यामध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, गोळीबार केल्यानंतर आरोपी फारार झाले आहेत. तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या गोळीबारात आंदेकर गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून काय सुरु आहे, असा प्रश्न निर्माण झालाय. एका टू व्हीलरवरुन दोघं जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली आहे. आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर केल्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्लाही करण्यात आलाय. ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जे लोक आंदेकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते, ते लगेच फरार झाले आहेत. दरम्यान, फायरिंग झाल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली आहे. हॉस्पीटलच्या बाहेर देखील त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगार डोकं वर काढताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांची भीती कोठे राहिली आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण पुण्यात आता माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आलाय.

माहिती अशी की, एका टू व्हीलरवरुन दोघं जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली आहे. गोळीबार करून कोयत्याने वार देखील करण्यात आले आहेत. दरम्यान हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती. शिवाय आपल्यामध्ये एकजूट असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला केलाय. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंबेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने के लिए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!