श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-श्रीरामपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे भर पावसात श्रीरामपूर रेल्वे स्टेशन समोर आले असता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांना रामदास आठवले यांनी पूर्णाकृती पुतळा संदर्भात काय अडचण आहे ते विचारले असता सुभाष त्रिभुवन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागा वन विभागाची असून पूर्ण कृती पुतळा बसवण्यास परवानगीस अडचणी येत आहे परंतु त्या जागेचे निर्वणीकरण झालेले असून त्याचे त्याचे तीन नोटिफिकेशन मिळाले आहे परंतु अजून एक नोटिफिकेशन मिळत नसल्याने जिल्हाधिकारी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यास परवानगी देत नाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी वन विभागाशी पुत्र व्यवहार करून लवकरात लवकर श्रीरामपूर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे परवानगी चे काम मार्गी लावू असे ठोस आश्वासन दिले.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यास जागा कमी पडेल हे रामदास आठवलेच्या लक्षात आले असता सुभाष त्रिभुवन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे बाबासाहेबांच्या पुतळ्या लगतची दोन गुंठे जागेची मागणी केली आहे रामदास आठवलेना जागे संदर्भात रेल्वे प्रशासनास पत्रव्यवहार करू असे देखील आश्वासन दिले.
लवकरच श्रीरामपूरकरांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे स्वप्न साकार होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही त्यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात राज्य सचिव विजय वाघचौरे राज्याचे नेते राजाभाऊ कापसे, राहुल मुथा, संदीप धीवर, अब्दुल शेख, शुभम लोळगे, तय्यब पठाण, कैलास लाळे, महिला आघाडीच्या रमाताई धीवर, संजय रूपटक्के, राजू नाना गायकवाड, सुरेश जगताप, मनोज काळे आधी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीचे निवेदन स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहुल मुथा यांनी निवेदन दिले.