पाथर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):- सोमवारी झालेल्या पावसाने तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा पाऊस कोसळला आहे.ऑगस्ट महिन्यातही सहापैकी पाच मंडळामध्ये अतिवृष्टीचा पाऊस झाला .
आता पुन्हा सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी तालुक्यात सहा मंडळात अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे. रविवारी सकाळपासून सुरू असलेला पाऊस आज पहाटे काही वेळा करता थांबला त्यानंतर दुपारपर्यंत अधून मधून पावसाची बॅटिंग सुरू होती. दुपारी वरून राजा थांबल्यानंतर बळीराजांनी आपल्या बैलांची सजावट सुरू करून आनंदात पोळा सन साजरा केला.
दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते मात्र सोमवारी दुपारी पावसाने उघडी दिल्याने दैनंदिन कामाला नागरिक घराबाहेर पडून कामाला गती आली. पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतातून काढलेला उडीद आणि मूग पिक ठेवण्यासाठी मोठी धावपळ उडाली होती. पावसाचा कमी जादा जोर सुरू राहिल्याने शेतीकामासह अन्य कामही लोकांना करता आली नाही. झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र असून निसर्गरम्य असा गर्भगिरीच डोंगर परिसर त्यातून कोसळणारे धबधबे, नदी, नाल्या ओसंडून वाहत असून तालुक्यातील बहुतेक सर्व मोठे व छोटी तालावे भरले.
सांडव्यातून पाणी वाहत आहे. यापूर्वीही झालेल्या पावसाने घाटशिरस, शिरसाटवाडी, कुत्तरवाडी अशी मोठी तलावे यापूर्वी पावसाने भरून गेली आहे. तर रविवारच्या पावसाने पटेलवाडा तलावाचे पाणी सांडव्याद्वारे बाहेर पडत आहे.मायंबाच्या गर्भगिरी डोंगर रांगांमध्येही जोरदार पाऊस झाल्याने या डोंगर परिसरातील पावसाचे पाणी मढी, घाटशिरस परिसरात येत आहे. झालेल्या पावसाने तालुक्यात कुठेही कोणतीही जीवित हानी अथवा नुकसान झाल्याची माहिती सोमवारी सायंकाळपर्यंत हाती आली नव्हती.पाथर्डी तालुका ऑगस्ट महिन्याची पावसाची सरासरी १४६.६० आहे.त्यापैकी रविवारी तालुक्यात सरासरी ७१.६० मिलिमीटर पाऊस झाला.पाथर्डी मंडळ ६६.५० माणिकदौंडी मंडळ ६६.०० टाकळीमानुर मंडळ ८१.०० करंजी मंडळ ८१.८१ कोरडगाव मंडळ६९.५० व मिरी मंडळ ६५.०० मिलिमीटर पाऊस झालेला आहे.