9.8 C
New York
Saturday, October 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

भिवसेन टेमकर यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर

पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- गेली नऊ वर्षांपासून पत्रकारिता तसेच एन टीव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून काम करत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भोसे येथील पत्रकार भिवसेन टेमकर यांना एन टीव्ही न्यूज मराठी या वृत्तवाहिनीने गेल्या पाच वर्षांत आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात समता बंधूता आणि सामाजिक एकता जोपासण्यासाठी तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रामाणिकपणे भूमिका बजावली.

त्यानिमित्ताने अहमदनगर येथील तारकपूर बसस्टॅडशेजारी हॉटेल व्ही स्टार येथे मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता एन टिव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार देऊन पत्रकार भिवसेन टेमकर यांना सन्मानित केले जाणार आहे.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने,खासदार निलेश लंके,आमदार संग्राम जगताप,अहमदनगर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातपुते,प्रसिद्ध साहित्यिक व्याख्याते संजय कळमकर,ॲड.सुभाष काकडे,एन टीव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक इकबाल शेख यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्रातील एन टिव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा,तालुका प्रतिनिधी व इतर प्रमुख मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!