कोल्हार दि.२२ (प्रतिनिधी):-प्रवरेत शिक्षण घेतलेल्या मुली या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलीमध्ये आत्मविश्वास देण्याबरोबरचं सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी शिक्षणातून पुढे जावू शकते हे प्रवरा शैक्षणिक संकुलाने सिद्ध करत आज प्रवरेच्या अनेक कन्या उच्चपदावर आहेत असे प्रतिपादन राज्य गुप्तचर विभागाच्या अप्पर उप-आयुक्त आणि माजी विद्यार्थी लता शिरसाठ यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात लता शिरसाठ या बोलत होत्या.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि संस्थेच्या विश्वस्त सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पद्यश्री डाॅ.विखे पाटील कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे,स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य संभाजीराजे देवकर,बाबासाहेब दळे,निखिल जगताप,प्रकाश खर्डे,दत्ताञय राजभोज,प्राचार्य डाॅ.हरीभाऊ आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात लता शिरसाठ
म्हणाल्या, ग्रामीण मुलींना उच्च शिक्षणासोबतचं आत्मविश्वासा धाडस आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढत पुढे जाण्याचे ज्ञान दिल्याने आज माझ्या सह प्रवरेच्या अनेक मुली उच्च स्थानावर आहेत. शिक्षणा सोबतचं येथे असलेल्या विविध सुविधा करिअर मार्गदर्शन आणि प्रत्येक गोष्टीवर मात करण्याची प्रेरणा मिळते. मुलींसाठी मोठ्या करीअर संधी आहेत. आई- वडीलांचा विश्वास संपादन करत पुढे जातांना आपले ध्येय निश्चित करा.सकारात्मक रहा. मेहनत करा. गरीब श्रीमंत हा भेद शिक्षणांत नसतोच आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवा असा संदेश यावेळी शिरसाठ यांनी देतांनाच आपल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करतांना प्रवरेच्या शिक्षणाचा कसा उपयोग झाला हे सांगत मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
आपल्या अध्यक्षीय मनोगात सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी प्रवरेच्या मुली आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. शेतक-यांची मुलगी उच्च पदावर जावी हे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न होते ते आज पूर्ण होतांना आनंद होत आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिक्षणातून ग्रामीण भागाचा विकास हाच ध्यास ठेवत शिक्षणासोबत विविध सुविधा निर्माण केल्याने शिक्षणाबरोबर नोकरीची संधी हा उद्देश साध्य होत आहे. आई- वडीलांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाने शिक्षण घेते पुढे जा विखे पाटील परिवार आपल्या सोबत कायम आहे हा आत्मविश्वास देतानांच महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले.
आपल्या प्रास्ताविकांमध्ये प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी विविध क्षेत्रात नाविन्य मिळविणाऱ्या प्राध्यापक, विद्यार्थी यांचा गौरवही मान्यवरांनी केला. अहवाल वाचन उपप्राचार्य डॉ. एस. एन. शिंगोटे, डॉ. एस. एन. डाळींबे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. तुषार आहेर, प्रा. प्रियांका शिरसाठ यांनी तर आभार डॉ. प्रकाश पुलाटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॅ. प्रतिभा कानवडे, प्रा. एस. एस. धिमते, डॉ. आर. एल. वडमारे, डॉ. पी टी तुपे, पी एस. औटी, प्रा. यु. ओ. येवले, डॉ. विनोद कडू, विद्यार्थी प्रतिनिधी अनिता खर्डे आदीनी विशेष परिश्रम घेतले.
…
मी प्रवरेची माजी विद्यार्थी आहे.माझ्या यशात प्रवरेचे योगदान मोठे आहे.ध्येय निश्चित असले तर यश मिळते. शिक्षणासोबतचं शेतात काम केले. पैसा नाही म्हणून क्लास नाही पण क्रिडा क्षेत्रात कबड्डीने नांव दिले. राष्ट्रीय पातळीवर जाता आले. प्रवरेचा आत्मविश्वास सोबत असल्याने उच्च पदाबरोबरचं अनेक संधीतून वेगळी ओळख निर्माण केली. एच. आय. व्ही.ग्रस्त मुलासाठी काम करण्याची प्रेरणाही प्रवरेतून मिळाली.
-लता शिरसाठ