कोपरगांव( जनता आवाज वृत्तसेवा): – पोलिसांकडून दंगलकाबू पथकाची रंगीत तालिम ;नागरिकांची मात्र धांदल गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरामध्ये पोलिसांकडून दंगलकाबू पथकाचे रूटमार्च आयोजन करण्यात आले होते. कोपरगांव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर दंगलकाबू पथकाची रंगीत तालीम प्रात्यक्षिक करण्यात आले व तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला होता.
.नागरिकांनी निर्भय वातावरण आणि आनंद उत्साहात येणारे सण साजरा करण्यात यावा तसंच सोशल मीडियावर अफवा पसरवून दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करतील यावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला याची माहिती द्यावी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी दंगलकाबू पथक आणि रूटमार्च आयोजन करण्यात आल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.सदरच्या रूट मार्चमध्ये 50 कर्मचारी व रुग्णवाहिका आणि अग्निशमक दलाचे कर्मचारी व अधिकारी सामील झाले होते.