कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार बुद्रुक येथे तीनचारी भागात प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी साई सच्चरित पारायण सोहळा आयोजीत करण्यात आला. गुरुवारपासून या सोहळ्यास प्रारंभ झाला असून शुक्रवार दि. २८ एप्रिल रोजी रामकृष्ण महाराज सत्यगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने पारायणाची सांगता होणार आहे.
साई पारायण सोहळ्याचे यंदाचे हे १२ वे वर्ष आहे. येथील साई सूर्योदय ग्रुपच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विलास निबे व सौ. रंजना निबे यांच्याहस्ते श्री साईंच्या मूर्तीला अभिषेक व पूजा करण्यात आली. तसेच कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे व सौ. शितल खर्डे यांच्याहस्ते आरती करून पारायणास सुरुवात झाली. बापूसाहेब महाराज बोऱ्हाडे हे व्यासपीठचालक आहेत. दररोज सायंकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान श्री साईंची आरती व ग्रंथवाचन केले जाते.
शुक्रवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ७ : ३० वाजता ग्रंथ अवतरणिका वाचन होऊन भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे. मिरवणूकीनंतर सकाळी १० : ३० वाजता रामायणाचार्य रामकृष्ण महाराज सत्यगावकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
पारायण सोहळा यशस्वी करण्याकरिता साई सूर्योदय ग्रुपचे विजय डेंगळे, बापूसाहेब देवकर, सुरज देवकर, शिवम डेंगळे, ओम डेंगळे, भाऊसाहेब जाधव, संकेत देवकर, जगन्नाथ मिजगुले, राकेश पवने, ऋतिक राऊत, विजय निबे, मनोज गव्हाणे, अजित सोनवणे, निलेश पानखेडे, आतिष देवकर, जितेंद्र जाधव, निलेश शेळके, पांडुरंग पागीरे, गणेश मुंदडा आदि प्रयत्नशील आहेत.