पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- तीन दिवसापूर्वी शेवगाव पाथर्डी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शेतकरी राजाच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. याविषयी तहसीलदार व महसूल मंडळ यांनी लवकरात लवकर लक्ष घालून दोन्ही तालुक्यामधील पिकाचे पंचनामे करून त्वरित शासनाच्या वतीने मदत करण्यात यावी अशी मागणी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केली आहे.तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे महसूल प्रशासनाने पंचनामे करत या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करावा व शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती केली आहे.
चालू वर्षी झालेल्या पावसामुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन या संकटातून बाहेर काढावे. देशात मान्सूनचे आगमन होताच दोन्हीही तालुक्यात पावसाला सुरवात झाली. चालू वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होईल या अंदाजाने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कापूस,तूर,उडीद,मूग व बाजरीच्या पिंकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. हे पीक हातातोंडाशी आल्या नंतर मात्र पावसाने जोरदार हजेरी दोन्हीही तालुक्यात लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून चालला आहे. सातत्याने हा परिसर दुष्काळी असून सतत त्याला तोंड देण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. मात्र सलग दोनदा अतिवृष्टीचा पाऊस झाला असून यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे होऊन शेतकऱ्याला मदत करण्याचे आवाहन दौंड यांनी केले असून शेवगाव,पाथर्डी येथील तहसीलदार व महसूल मंडल अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.