9.9 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

वृंदावन’मध्ये बीज गणपती प्रात्याक्षिकाचे आयोजन


संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा) :- 
डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संस्थेच्या वृंदावन कृषी महाविद्यालय, संगमनेर (गुंजाळवाडी पठार) येथील कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत बीज गणपती प्रात्याक्षिक आयोजन करण्यात आले. 

या प्रात्याक्षिक कार्यक्रमात बबन कानवडे आणि गंगाधर बोऱ्हाडे यांनी शाडो मातीचा गणपती कसा बनवायचा याची प्रत्यक्ष कृती विद्यार्थ्यांसमोर करून दाखवली. गणपती बनवत असताना विविध झाडांच्या बिया मातीत मिश्रित केल्या गेल्या म्हणून या कृतीस बीज गणपती प्रात्याक्षिक असे संबोधले.

तसेच बीज गणपती पाण्यात विसर्जित न करता ते मातीत विसर्जित करावे जेणेकरून गणपतीमधील बियांचे रुपांतर झाडांमध्ये होईल आणि त्यापासून पर्यावरणाचे संवर्धन होईल असे आव्हान बबन कानवडे आणि गंगाधर बोऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. प्राची शिंदे यांनी केले.

यावेळी वृंदावन कृषीमहाविद्यालयाचे डॉ. योगेश एखंडे, डॉ. अनंता महाले, प्रा. दादासाहेब गोलांडे, प्रा. आशिष सहाणे, प्रा. पूजा हापसे, प्रा. सुप्रिया घुले, प्रा. विक्रम कोरडे, प्रा. मालती बनसोड, प्रा. प्रदीप शेळके, प्रा. अनिल ढेरंगे, प्रा. वाळूज आणि सर्व कृषीचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा पर्यावरणपूरक वापर करावा, म्हणून सदर प्रात्याक्षित यशस्वी करण्यासाठी वृंदावन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!