कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा ):-कोपरगाव तालुका पोलीस ठाणे, जि अहमदनगर कडिल अकस्मात क्रमांक ४४/२३ दिनांक २८/०६/२०२३ रोजी प्रमाणे दाखल होता. सदर अकस्मात मधील मयत नामे अभिजीत राजेंद्र सांबरे रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक याचा मृत्यु संशयास्पद झाला असल्याबाबत त्याचे नातेवाईक यांचे सांगणे होते.
सदर संशयास्प्द मुत्यू त्याचे सोबत असणारा इसम नामे प्रमोद जालींदर रणमाळे याने घडवुन आणला असल्याबाबत संशय होता. करीता गुन्हेशाखा, युनिट क. २ कडिल पोहवा मनोहर शिंदे यांनी सदर अकस्मात मुत्यू बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यातील संशयित नामे प्रमोद जालींदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, यांनी शिताफिने ताब्यात घेतले. सदर संशयित इसम नामे प्रमोद जालींदर रणमाळे यास वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे यांनी तपास कौशल्य, अ.मू.चे पेपर अवलोकन, तांत्रीक विश्लेषण वापरून विचारपुस करता सदर इसम नामे प्रमोद जालीदर रणमाळे याने यातील मयत अभिजीत सांबरे हा त्याचा मित्र होता.
त्यांचे यापुर्वीपासुन पैश्यांचे व्यवहार होते व त्यातुन त्यांचा वाद विकोपास गेला होता. त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे याने मयत इसम अभिजीत सांबरे यास मारण्याबाबत डाव आखलेला होता. दिनांक २७/०६/२०२३ रोजी आर्थीक व्यवहाराकरीता यातील मयत हा येवला जि, नाशिक येथे जाणार होता. त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते. संशयित प्रमोद रणमाळे याने यातील मयत अभिजीत सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेवुन रात्री ०९:०० वाचे सुमारास त्यास दारूमधुन ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरीक्त मात्रेमध्ये गोळया मिसळुन त्यास दारू पाजली.
त्यातुन मयत इसम नामे अभिजीत सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असतांना त्यास त्याचे बुलेट गाडीवर मागे बसुन येवला येथुन संभाजीनगर कडे जाणा-या रस्त्याने वैजापुर गावाजवळुन कोपरगाव रस्त्याने घेवुन गेला. मयत इसम अभिजीत सांबरे याची शुध्द हरपल्याचा अंदाज घेवुन गाडी थांबवुन त्यास कोपरगाव रस्त्याचे कडेला फेकुन देवुन पोबारा केला होता. बाबत कबुली दिली आहे. त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुरनं. ३०७/२४ भादंविक ३०२ प्रमाणे दाखल झाला असुन त्यास पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे ताब्यात देत आहोत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, संदीप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री संदीप मिटके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक/श्री. विद्यासागर श्रीमनवार, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क २ कडील सपोनि समाधान हिरे, उप निरी. यशवंत बेंडकोळी, पोहवा/मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, पोअं/विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, स्वप्नील जुंद्रे अशांनी केलेली आहे.