पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मिरी गावापासून रुपेवाडी,घोडेगाव या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून या रस्त्याची तात्काळ निधी उपलब्ध करून दुरुस्ती करावी अशी मागणी मिरी,रूपेवाडी ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे खासदार निलेश लंके यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी बाळासाहेब घुले महाराज,भागिनाथ गवळी,बंडू झाडे,एकनाथ झाडे,राहुल गवळी,राजू इनामदार,विजय गवळी,विष्णू सोलाट,आसाराम भगत,विजय गुंड,अशोक घोंगडे,अशोक गवळी,जाकीर पटेल,भारत गवळी,राजू वाघ व इतर ग्रामस्थांनी खासदार निलेश लंके यांचा मिरीत आल्यानंतर सन्मान केला.
त्यानंतर त्यांचे लक्ष मिरी,रूपेवाडी,घोडेगाव या खराब झालेल्या रस्त्याकडे वेधले.या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्या.अशी देखील मागणी यावेळी केली.खासदार लंके यांनी देखील तात्काळ संबंधित विभागाला संपर्क साधून निश्चितपणे या रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास मिरी,रुपेवाडी ग्रामस्थांना यावेळी दिला.