राहाता (जनता आवाज वृत्तसेवा ):-विद्यार्थ्यांना खेळाचे अद्यावत ज्ञान व शिक्षण मिळावे या उद्देशाने महाविद्यालयामध्ये इनडोअर स्टेडियम उभारले जात असून ग्रामीण भागातून चांगल्या प्रकारचे खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली.
राहाता येथील शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बंदिस्त प्रेक्षागृहाच्या (इनडोअर स्टेडियम ) नूतन इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ सौ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.
सौ.शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, खेळ हा विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचा आहे. खेळ वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त, गटामध्ये काम करणे हे शिकवतो. खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास आणि त्यामध्ये सुधारणा करण्यास मदत करतो. खेळाचा नियमित सराव केल्यास आपण अधिक सक्रिय व निरोगी राहू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इनडोअर स्टेडियमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य देखील तंदुरुस्त राहण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना खेळाचे अद्यावत ज्ञान व शिक्षण मिळावे, ग्रामीण भागातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने इनडोअर स्टेडियम उभारले जात आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील, शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटचे संचालक श्री ज्ञानदेव लक्ष्मणराव पा.म्हस्के, श्री भारत घोगरे, अँड.रघुनाथराव बोठे, मुकुंदराव सदाफळ,भगवानराव डांगे, डॉ.महेश खर्डे, सुरेश गाडेकर,प्राचार्य डॉ.सोमनाथ घोलप, प्राचार्य सुनील दंडवते, प्राचार्य किशोर निर्मळ, उपप्राचार्य डॉ.दादासाहेब डांगे, प्राचार्य नारायण गुळवे, सर्व प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.दादासाहेब डांगे यांनी केले. तर आभार प्राचार्य डॉ.सोमनाथ घोलप यांनी मानले.