कोपरगाव(जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा अमलात आणलेला असून सुद्धा बहुतेक ठिकाणी हा कायदा तोडण्याचे साहस होताना दिसून येत आहे त्याचे प्रत्यय दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव शहरात आज दिसून आले कत्तलीच्या उद्देशाने असलेले पाच गौ वंश वाचवण्यात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व गौरक्षक यांना यश आले आहे ही यशस्वी कारवाई धडाकेबाज वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केली आहे.
गुन्हा रजिस्टर नंबर389/2024 प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 व 9 प्राण्यास निर्दीपणे वागवणे कलम 11 एक ड महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 सह केंद्रीय वाहतूक कायदा कलम125 (ई) महा वाहतुक कायदा कलम 130 /177 प्रमाणे अरबाज मज्जित कुरेशी राहणार संजय नगर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तसेच पिकप गाडी सह 5लाख दहा हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कार्यवाहीत सहभागी असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल जे पी तमनर पोलीस हेड कॉन्स्टेबल आर पी पुंड सर्व पोलीस स्टाफ व गौरक्षक यांचे खूप खूप अभिनंदन नागरिकांनी केले आहे




