11 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

भावी आमदार’ युवराज जरा दमानं घ्या! अंधाराच्या गाठीभेटी थांबवून श्रीगोंद्यात पारदर्शक कारभार करण्याची कार्यकर्त्यांची मागणी

महेश रकताटे (कार्यकारी संपादक) 

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- कार्यकर्त्याची आपल्याला पसंती असल्याचे भासवून श्रीगोंद्यात युवराज सध्या सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. पैसे देऊन युवराज प्रसिध्दीचा स्टंट करीत आहेत. या अगोदरही युवराज यांनी असाच स्टंट केला होता. त्यावेळी उमेदवारी न मिळाल्याने युवराज नाराज होऊन शहरात जाऊन बसले होते. 

आता त्यांना आमदारकीचे स्वप्न पडल्याने पुन्हा श्रीगोंद्यात अवतरले असून कार्यकर्त्यांची आपल्याला पसंती असल्याचे भासवत आहेत. श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक पूर्व सर्वेक्षण समोर आले आहे. यात विधानसभा निवडणुकीत आपले नाव पर्यायी उमेदवार म्हणून पुढे युवराजने पुढे केलेले आहे. यासाठी युवराजने प्रसिध्दीचा स्टंटबाजी करून आर्थिक गणिते जुळवून आपल्याला सर्वाधिक कार्यकर्त्यांची पसंती असल्याचे श्रीगोंदे तालुक्यासह जिल्ह्याला भासवले आहे.

युवा नेत्याच्या नावाला मतदारसंघातील बहुतांशी मतदारांनी नापसंत या अगोदर केलेले असून आताही ‘युवराज’ तुम्ही थांबा, असे मत कार्यकर्ते नोंदवत आहेत. विशेष म्हणजे बहुतांशी मतदारांनी मतदारसंघात बदल करण्याचे संकेत देत महिला नेत्यांना पसंती दिली जाणार आहे. यामुळे श्रीगोंद्यातील ‘त्या’ युवा नेत्यांची मोठी अडचण झाली आहे.मदार म्हणून विधानसभा निवडणुकीत आमदाराच्या पुत्राच्या नावाला मात्र सर्व्हेत ब्रेक लावलेला दिसून येत आहे. तरीही हा नेता अंधारातून तिर मारत बसला आहे. आपल्या नावाचं ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न या युवराजने सुरु केला आहे.

युवराजच्या या प्रयत्नांना पक्षातूनच विरोध होत आहे. त्याकडे कानाडोळा करून युवराज आपले काम करत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याच युवराजने दहा वर्षांपूर्वी लोकसभेची तयारी केली होती. त्यावेळी सुध्दा युवराजने उद्योग करून प्रसिध्दी मिळवली होती. त्यात आर्थिक उलाढाल मोठी केली होती. आता स्वत:बद्दल कौतुक स्तुमने करून घेतले आहे. या सर्व बाबी आर्थिक इतर गोष्टींवर झाल्याची चर्चा आहे.

अनेकांनी यापूर्वी युवराजवर भरोसा दाखवला होता. पण लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने हा युवराज गायब झाला होता. मधल्या काळात हा युवा नेता कुणाच्या संपर्कातच नव्हता. आता निवडणूक समोर ठेऊन या युवा नेत्याने उमेदवारी आपल्या पदरात पडते का? यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ज्यांचा जिल्ह्यातील राजकीय अभ्यास नाही, अशांच्या संपर्कात हा नेता जात असून चुकीच्या माहितीच्या आधारावर पुढील डावपेच टाकत आहे. हीच चूक दहा वर्षापूर्वी या नेत्याने केली होती. आता पुन्हा तीच चूक करीत आहे. याच चुका युवराजला अडचणीत आणत आहे.

इतके दिवस कोठे होता?

युवराज सध्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊ लागला आहे. गाठीभेटी घेऊन युवराज पुढे गेल्यानंतर कार्यकर्ते हा इतके दिवस कुठे गेला होता? याला आपली आठवण आली का? आता याला सहकार्य करायचे नाही? हा फायदा पुरता आहे? निवडून आल्यावर हा लक्ष देणार नाही? त्यामुळे याच्या ऐवजी दुसराच पर्याय निवडावा लागेल, अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये जोर धरत आहे.

चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन

युवराजला चुकीच्या पद्धतीने आता मार्गदर्शन केले जात आहे. त्यांच्या भोवती असलेली मंडळी त्यांना चुकीचा मार्ग दाखवून तिकडे घेऊन जात आहे. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. मागे जे झाले तेच आताही होत आहे. त्यामुळे आता युवराजांनी सावध होणे गरजेचे आहे. त्यांनी मार्गदर्शन करणाऱ्यांना बाजूला सारणे महत्त्वाचे आहे. अन्यथा आगामी निवडणुकीत पराजय निश्चित आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!