मुंबई( प्रतिनिधी ):-आज मुंबई येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद मुंबई अध्यक्षपदी अनुजा गायकवाड यांची निवड करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद मुंबई अध्यक्षपदी अनुजा गायकवाड.
अनुजा गायकवाड यांच्या निवडी बद्दल राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील,जि प माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील व खा डॉ सुजयदादा विखे पाटील व रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्री ताई विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



