लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-शिर्डी मतदार संघात महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाने प्रवरानगरी दुमदुमली.शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या कला अविष्कार सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
शालेय ते महाविद्यालयीन पातळीवरील मुला-मुलींच्या उपजत कला व क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळावे आणि स्थानिक नागरिकांना आपल्याच मुलांच्या विविध कलागुणांतून मनोरंजन व्हावे, या उदात्त व प्रामाणिक उद्देशाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुष्मिताताई विखे पाटील,,पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे पाटील , सह सचिव भारत घोगरे, डाॅ.उत्तमराव कदम, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे,डाॅ.बी.बी.अंबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सांस्कृतिक महोत्सवात प्रवरा परिसरातील अनेक संस्थांच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.यात वैयक्तिक गायन, गणेश वंदना,एकपात्री प्रयोग, समूहगायन,समूहनृत्य,विधायक संदेश देणाऱ्या नाटिका, संगीत नाटिका,देशभक्तीपर गीते,सामाजिक संदेश देणा-या एकांकिका इ.सादर करण्यात आल्या.सांस्कृतिक महोत्सवामुळे उपस्थित रसिक श्रोत्यांना मनोरंजनाची अनोखी पर्वणी मिळाली.यात प्रवरा पब्लिक स्कूल,प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील विद्यालय बाभळेश्वर, प्रवरा औषधनिर्माण महाविद्यालय,प्रवरा अभियांञिकी महाविद्यालय प्रवरा कृषिशास्ञ संस्था आदी शाखांचा समावेश होता.
.चिमुकल्यासह महाविद्यालयांच्या विविध कलाविष्कार त्याचबरोबर पद्मश्री सहकाराचा महामेरू, चंद्राची सफर, पर्यावरण संवर्धन,स्ञी शक्तीचा जागर,छञपती शिवाजी महाराज जीवनपट, महाराष्ट्राची लोकधारा या उपक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे यांनी प्रवरेच्या माध्यमातून शिक्षणासोबतच मुलांच्या कला अविष्कारांना देखील व्यासपीठ दिले जाते ग्रामीण भागातून चांगले कलाकार निर्माण होऊ शकतात हेच या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे अशा शब्दात विद्यार्थ्यांचं कौतुक केले. या कार्यक्रमात १६ शाळा- महाविद्यालयांतील ३६९ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.



