लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळास महत्त्व देण्याची गरज आहे. विद्यार्थी खेळाच्या माध्यमातूनही आपले करिअर घडू शकतात खेळास प्रवरने नेहमीच प्रोत्साहन दिल्याने प्रवरेचे खेळाडू हे राज्य आणि देशपातळीवर पोहोचले आहेत असे सांगतानाच श्री गणेश उत्सवाच्या माध्यमातून होणाऱ्या क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवा अंतर्गत पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयांमध्ये ” सहकारातून समृद्धीकडे” या उपक्रमा अंतर्गत पद्मश्रींचे जीवन कार्य आणि सामाजिक बांधिलकी यावर आधारित रांगोळी स्पर्धा सोबतच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जीवनपट आणि त्यांचे कार्य याविषयी प्रदर्शन आणि प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवा अंतर्गत हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या.
यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिताताई विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, कॅम्पस संचालक डॉ. आर. ए .पवार, उप प्राचार्य डॉ. शांताराम चौधरी,प्रा. छाया गलांडे,डाॅ.अनिल वाबळे, क्रीडा संचालक डाॅ. प्रमोद विखे,डाॅ.उत्तम अनाप आदीसह प्राध्यापक,क्रिडा शिक्षक ,स्पर्धक संख्येने उपस्थित होते.
यावेळी सौ. विखे पाटील म्हणाल्या, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देतानांच खेळाच्याही सर्व सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. शिर्डी मतदार संघात सुरू असलेला प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव तसेच सहकारातून समृद्धीकडे हा उपक्रम लोकाभिमुख ठरत आहे.क्रिडा महोत्सवातून खेळाडूंनी चांगले खेळ खेळत आपले आरोग्य जपावे. स्वयंशिस्तीचे चांगले प्रदर्शन करावे. प्रवरेतून शिक्षणासोबतच प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातून अनेक विद्यार्थी हे केवळ खेळातून पोलीस आर्मी सह शासकीय सेवेत सहभागी होत आहेत. कौशल्य आधारित विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून मंत्री ना. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. प्रामाणिकपणे खेळा यश अपयश याची चिंता करू नका हा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला. यावेळी प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी ऋषिकेश बबन तांबे यांची पुणे ग्रामीण पोलीस आणि गणेश राजेंद्र आव्हाड यांची एस आर पी एफ मुंबई येथे निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरवही यावेळी करण्यात आला.
प्रारंभी क्रिडा संचालक डॉ. प्रमोद विखे यांनी प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवा अंतर्गत सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेचा आढावा घेत प्रवरा शैक्षणिक संकुलासह विविध शाळा महाविद्यालयाचे मुला-मुलींचे ५२ संघ सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. शांताराम चौधरी यांनी तर आभार डाॅ.उत्तम अनाप यांनी मानले.
प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ देतांनाच सहकारांतून समृृृृध्दीकडे हा अंतर्गत सामाजिक संदेश देणारी रांगोळी स्पर्धा ही लक्षवेधी अशीचं ठरली.



