spot_img
spot_img

मूल पळवणारी टोळी समजुन गीतेवाडी ग्रामस्थांकडून चार संशयितांना चोप संशयित पोलिसांच्या ताब्यात

पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात गितेवाडी येथे गुरुवारी सकाळी चार परप्रांतीय तरुण प्राथमिक शाळा परिसरात कुकर भांडी विक्री करण्यासाठी आले असता त्यांनी शाळा परिसरातील काही विद्यार्थ्यांना जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला आणि हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाला आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना या अज्ञात तरुणांकडून पळून नेण्याचा प्रयत्न असल्याचा संशय काही ग्रामस्थांना आल्यानंतर गीतेवाडी गावातील काही ग्रामस्थांनी या संशयीत तरुणांना चांगला चोप देऊन त्यांना शाळेच्या एका खोलीत कोंडून ठेवले.या तरुणांबद्दल पाथर्डी पोलिसांना माहिती कळवली त्यानंतर काही वेळातच मिरी पोलीस चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल पोपट आव्हाड गीतेवाडीत दाखल झाल्यानंतर त्यांनी या चार संशयीत तरुणांना ताब्यात घेऊन अधिक माहितीसाठी पाथर्डी पोलीस स्टेशनला नेले.पोलिसांनी देखील या चार तरुणांकडे कसून चौकशी केली असता.

ते परप्रांतीय आहेत मात्र मुले पळवणारे नाहीत ते खेडेगावात कुकर भांडी विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती समजली.असे असले तरी शाळा परिसरात कशासाठी गेलात याबाबत मात्र पोलिसांनी या चौघांना चांगला दम भरून नंतर सोडून दिले.एकंदरीत भांडे विक्रीच्या निमित्ताने शाळा परिसरात फिरकल्याने या चार तरुणांना ग्रामस्थांच्या रोशाला सामोरे जात चांगला चोप मिळाल्याची चर्चा चिचोंडी परिसरात सुरु आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!