spot_img
spot_img

अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या दिव्या शिंदेची राष्ट्रीय अथलेटिक्स साठी निवड

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला पूर्णपणे वाव देताना अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये चमकले असून नुकतेच अंडर 19 वयोगटात 3000 मीटर रनिंग स्पर्धेमध्ये दिव्या विजयकुमार शिंदे हिने रौप्य पदक मिळवले असून तिची राष्ट्रीय ॲथलेटिक्स साठी निवड झाली आहे

माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व संस्थेच्या विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने स्पोर्ट ऍक्टिव्हिटी, कल्चरर ऍक्टिव्हिटी आणि गुणवत्ता ही त्रिसूत्री जपताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पूर्ण वाव दिला आहे.

कोल्हापूर येथे झालेल्या सीबीएससी क्लस्टर 9 ॲथलेटिक स्पर्धा 2024- 25 या स्पर्धेत अंडर 19 वयोगटात 3000 मीटर रनिंग स्पर्धेमध्ये दिव्या शिंदे हिने रौप्य पदक मिळवली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातील बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता येथे रनिंग , थ्रोइंग, जम्पिंग असे विविध क्रीडा प्रकार संपन्न झाले. दिव्याला आरोग्य पदक मिळाली असून तिची सात ते 11 ऑक्टोबर दरम्यान वाराणसी येथे होणाऱ्या ॲथलेटिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेमध्ये तिचा सत्कार करण्यात आला .

याप्रसंगी बोलताना सौ.देशमुख म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली अमृतवाहिनी शिक्षण संस्था आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून गुणवत्तेमुळे देशात नाव झाले आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. विविध स्पर्धांमध्ये आत्मविश्वास पूर्ण सामोरे जाताना अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांची ही कामगिरी संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचेही त्या म्हणाल्या

दिव्याच्या यशाबद्दल तिचे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक विवेक धुमाळ, डॉ जे बी गुरव, प्राचार्य श्रीमती जसविंदर सेठी यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!