spot_img
spot_img

ज्योती पतसंस्थेच्या अहमदनगर शाखेचा शुभारंभ संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी):– ज्योती पतसंस्थेच्या नगर येथील शाखेचा शुभारंभ संपन्न 35 वर्षापूर्वी 1988 साली कोपरगाव येथे स्थापन झालेली ज्योती पतसंस्था आज महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था म्हणून मानांकित झालेली आहे.
 ग्राहकांना उत्कृष्ट सेवा व विश्वासाचे नाते तसेच सचोटीचा व्यवहार यामुळे संस्थेच्या एकूण नऊ शाखा चा विस्तार झालेला आहे. संस्थेच्या एकूण 288 कोटीच्या ठेवी असून 178 कोटीचे कर्ज वाटप आहे स्वनीधी 22 कोटींचा असून एकूण व्यवहार सुमारे 466 कोटी पर्यंत आहे. संस्थेचा एनपीए नेहमीच शून्य टक्के राहून कायम ऑडिट वर्ग अ संस्थेस मिळत आहे. 
अशाप्रकारे विश्वासास पात्र संस्था अशी ओळख संस्थेची निर्माण झालेली आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन ॲड. रविकाका बोरावके यांनी दिली. 
अहमदनगर शहरातील अनेक ठेवीदार व खातेदार
संस्थेशी यापूर्वीच जोडले गेलेले आहेत. अहमदनगर येथे संस्थेची शाखा सुरू करावी अशी अनेक दिवसापासून आग्रही मागणी खातेदारांची होती. ती इच्छा आता पूर्ण झाली असून दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी सावेडी येथील माऊली संकुल येथे संस्थेच्या नगर शाखेचे कामकाज सुरू करण्यात आलेले आहे या छोटे खाणी शुभारंभ प्रसंगी संस्थेचे सर्व संचालक व नगर येथील
ठेवीदार, खातेदार व पत्रकार उपस्थित होते. व सर्वांचे स्वागत करण्यात आले व पहिल्या दिवशी अपेक्षे पेक्षा जास्त ठेवी ही प्राप्त झाल्या अशी माहिती संस्थेची मॅनेजर श्री सुरेश शिंदे यांनी दिली.
आज जरी छोट्याश्या दालनात संस्थेचा कारभार तातडीने सुरू करण्यात आलेला आहे लवकरच माऊली संकुल मध्येच मोठी जागा संस्थेस मिळत आहे. त्या मोठ्या जागेत अद्यावत फर्निचर व सर्व सोईयुक्त लवकरच स्थलांतर होणार आहे. अशी माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री देवराम सजन यांनी दिली. नगर शहरातील सर्व छोटे मोठे व्यावसायिक दुकानदार उद्योजक यांनी संस्थेच्या सेवेचा लाभ घ्यावा तसेच गुंतवणूकदारांनी आपल्या अमूल्य ठेवी या विश्वास पात्र अशा ज्योती पतसंस्थेत ठेवाव्यात असे आवाहन संस्थेचे चेअरमन ॲड. रविकाका बोरावके यांनी केले. 
ठिकाण- माऊली संकुल सावेडी रोड दुसरा मजला अहमदनगर- फोन 2995545
शाखा – कोपरगाव, सुरेगाव, शिर्डी, राहुरी, कोल्हार, श्रीरामपूर, येवला, पुणे, अहमदनगर
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!