कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा): – केवळ प्रवरा परिसरातीलच नव्हे तर परप्रांतातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साडेतीन शक्तीपिठांचे एकत्रित तीर्थक्षेत्र कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टला चालू आर्थिक वर्षापासून कलम ८० जी नुसार देणगी स्विकारण्यास आयकर आयुक्त पुणे कार्यालयाने मंजूरी दिली आहे.
कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या प्रकल्प आणि विकासासाठी जे भाविक आणि दानशूर भक्त स्वेच्छेने ट्रस्टला देणगी देतील त्यांना आयकर नियमानुसार चालू आर्थिक वर्ष २०२४ – २५ ते २०२६ – २७ या कालावधीसाठी आयकर विवरण पत्र दाखल करताना देणगी पावती च्या आधारे आयकरात सवलत मिळणार आहे. भाविक भक्तजनांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी तथा भाऊसाहेब रघुनाथ खर्डे, खजिनदार डॉ. भास्करराव खर्डे, माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे तसेच विश्वस्त मंडळाने केले आहे.