दाढ (वार्ताहर):-‘म्हणतात ना दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” याचा प्रत्यय दाढ बु।। येथे आला.
दाढ बु।। येथील श्री गोकुळ दत्तात्रय कडलग यांची कन्या चि.सौ.का वृषाली हीस चौधरवाडी (वरवंडी ) येथील श्री. सिताराम कोंडाजी परहाड यांचे चिरंजीव प्रविण हे मुलगी पहाण्यासाठी गुरुवार दिनांक १३/४/२०२३ रोजी दाढ बु।।येथे आले.
मुलामुलीची पसंदी झाली अन् विखे पाटील सहकारी साखर कारखाण्याचे संचालक श्री. देविचंद भारत पा. तांबे यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तो दोन्ही कडील मंडळींनी लगेच स्वीकारला. आणि लग्नाची तयारी सुरू झाली अवास्तव खर्चाला फाटा देत कुठलाही गाजावाजा न करता साखरपुड्याच्या कार्यक्रमात अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. अशा साध्या विवाह सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा विवाह सोहळा घडवून आणण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. देविचंद भारत पाटील तांबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच विवाह सोहळा पार पाडण्यासाठी श्री सुभाष मारुती तांबे पाटील, श्री सुभाष लक्ष्मण तांबे पाटील, श्री हरिभाऊ साहेबराव कडलक पाटील, ॲडवोकेट नकुल तांबे साहेब, सचिन गागरे, जयहिंद ट्रेडर्सचे संचालक सुनिल शेठ तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.



