कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार बुद्रुक येथील विवेक शेखर बोऱ्हाडे याने नुकतेच पुणे येथील श्रीमती काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले. सन २०२३ च्या अंतिम परीक्षेत विशेष प्राविण्यासह (डिस्टिंक्शन) गुण संपादन करीत त्याने घवघवीत यश संपादन केले.
 डॉ. विवेक शेखर बोऱ्हाडे याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बाभळेश्वर येथे विद्या विकास पब्लिक स्कूलमध्ये झाले. तिथे त्याला प्राध्यापक श्री. सेबॅस्टियन यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण पुणे येथील विद्यासरिता अकॅडमी येथून केले. याठिकाणी त्यास श्री. राजशेखर, श्री. ओमकार सर, मंगेश सर, बिजेय सरांचे  मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. विवेक बोऱ्हाडे हे कोल्हार बुद्रुक येथील कै. भास्करराव तुकाराम बोऱ्हाडे यांचे नातू असून डॉ. शेखर बोऱ्हाडे आणि सौ. शिल्पा बोऱ्हाडे यांचे चिरंजीव आहे. 




